कोरोना झोन: महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये कोणकोणते जिल्हे असणार?

महाराष्ट्र

कोरोना व्हायरसची देशभरातील जिल्हानिहाय स्थिती दर्शविणारी यादी केंद्र सरकारने 1 मे रोजी जाहीर केली आहे. ही यादी दर आठवड्याला अपडेट केली जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या रुग्णांची संख्या, ती संख्या किती दिवसांत दुप्पट होतेय (डबलिंग रेट), टेस्टिंगचं प्रमाण आणि व्याप्ती तसंच तज्ज्ञांचं निरीक्षण, या निकषांद्वारे सर्व जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

रेड झोन म्हणजे असा जिल्हा, तालुका किंवा महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले असतील. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 4 दिवसांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट होतेय.

ऑरेंज झोन म्हणजे असे जिल्हे, ज्यात गेल्या 14 दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

ग्रीन झोन म्हणजे असे जिल्हे, ज्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही किंवा गेल्या 21 दिवसात एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही.

लॉकडाऊन 2.0 मध्ये होते तेच निर्बंध 3 मेनंतरही रेड झोनमध्ये कायम ठेवण्यात आले आहेत, तर ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्समध्ये थोडे शिथिल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातले 14 जिल्हे रेड झोनमध्ये:

ज्या जिल्ह्यांमध्ये एकापेक्षा जास्त महानगरपालिका आहेत, तिथे प्रत्येक महापालिकेला वेगळं युनिट मानलं जाऊ शकतं. जर रेड झोनमधल्या जिल्ह्यातल्या एका महापालिका क्षेत्रात गेल्या 21 दिवसांत एकही कोव्हिड-19 ची केस आली नसेल, तर त्या महापालिका क्षेत्राला ऑरेंज झोन मानलं जाऊ शकेल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

महाराष्ट्रातले 16 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये:

महाराष्ट्रातले फक्त 6 जिल्हे ग्रीन झोनमध्ये:

वर दिलेली यादी दर आठवड्याला अपडेट करण्यात येते.

कोरोना
लाईन

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)