कोरोना लॉकडाऊन महाराष्ट्र नियम : दारू विक्री, सलून, बांधकाम - कोणत्या झोनमध्ये काय सुरू राहणार?

फोटो स्रोत, ANI
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या दृष्टीने महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झालाय. महाराष्ट्र सरकारनं आज चौथ्या लॉकडाऊनमध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीन झोननिहाय कुठल्या गोष्टी सुरू राहतील आणि कुठल्या गोष्टी बंद राहतील, याबाबत पत्रक काढून माहिती दिलीय.
रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता इतर झोनमध्ये सलून सुरू राहील, असं महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आलंय.
कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या तीव्रतेनुसार यापुढेही राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन जिल्हे, असं वर्गीकरण सुरू राहणार. कुठल्या झोनमध्ये कुठले व्यवहार सुरू राहतील, याचीही माहिती आधीच देण्यात आली होती.
राज्यातल्या कुठल्या झोनमध्ये कुठल्या गोष्टी सुरू राहतील, हे खालील तक्त्यावरून तुमच्या लक्षात येईल:
आतापर्यंत तीन लॉकडाऊन झाले आहेत -
- पहिला लॉकडाऊन - 24 मार्च ते 14 एप्रिल
- दुसरा लॉकडाऊन - 15 एप्रिल ते 3 मे
- तिसरा लॉकडाऊन - 4 मे ते 17 मे
- चौथा लॉकडाऊन - 18 मे ते 31 मे
दारुच्या दुकानांबाबत लॉकडाऊन-4 साठी आधीच निर्णय झालाय. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारानं परवानाधारक दारुची होम डिलिव्हरी सुरू केलीय. तीन-चार दिवसांपूर्वीच यासंदर्भातील निर्णय महाराष्ट्रात उत्पादन शुल्क विभागानं घोषित केलाय.
चौथ्या लॉकडाऊनची नीट अंमलबजावणी व्हावी म्हणून केंद्रीय पोलीस दलाच्या 9 तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. "मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आणि अमरावतीत आम्ही या तुकड्या तैनात केल्या आहेत. रमझान, आषाढी वारी, गणेशोत्सव आहे. अशावेळी केंद्रीय राखीव पोलीस दल मदतीला येईल," असं ते म्हणाले.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








