कोरोना संकटाला तोंड कसं द्यायचं, याचा मार्ग पंतप्रधान मोदी यांनी जगाला दाखवला – राम माधव यांचा दृष्टिकोन

    • Author, राम माधव
    • Role, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप

1914 पूर्वी युरोप, अमेरिका आणि त्यांच्या वसाहतींमध्ये येण्या-जाण्यासाठी व्हिसा, पासपोर्ट यांची गरज नव्हती. पण त्यानंतर पहिलं महायुद्ध झालं आणि परिस्थिती बदलली.

देशांनी स्वतःला बंद करून घेतलं आणि आपल्या सीमांबाबत कठोर झाले. यानंतर आर्थिक मंदीचं वातावरण सुरू झालं. राष्ट्रवाद आणि अति-राष्ट्रवाद टोकाला गेला. हेच दुसऱ्या महायुद्धाचं कारण बनलं.

दुसऱ्या महायुद्धानंतर एकमेकांशी संबंधित, एकमेकांवर अवलंबून असलेलं, जगाचं एक वैश्विक रूप निर्माण झालं. गेल्या 75 वर्षांपासून बऱ्याच चढ-उतारांनंतरही सध्याची ही वैश्विक रचना कायम आहे.

पण जॉस हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर स्टीव्ह हँकी यांच्या मते, "नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही नियोजनाशिवाय लॉकडाऊन लागू केलं होतं. पण खरं तर मला वाटतं, नियोजन याचा अर्थच नरेंद्र मोदींना बहुधा माहीत नसावा."

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली हे आरोग्य संकट सध्याच्या जागतिक संरचरनेला पुन्हा पूर्वीसारखी बनवण्याची धमकीच जणू देत आहे. पहिल्या महायुद्धानंतर जगातले देश आत्मकेंद्रुत आणि सत्ता समर्थक बनले होते. काही राजकीय तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसमुळे असंच जग पुन्हा निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

हे जग कित्येक पटींनी जास्त आत्मकेंद्रित आणि टोकाच्या राष्ट्रवादाने भरलेलं असेल. राष्ट्रांचं परतणं ही खरी बाब आहे. अर्थशास्त्रज्ञ भूमंडलीकरण आणि मुक्त व्यापाराचे दिवस संपण्याची गोष्ट सांगत आहेत.

इतकी निराशा कुठून आली. फक्त आपल्या डोळ्यांना दिसू न शकणाऱ्या 0.125 मायक्रो सेमी व्यासाच्या कोरोना व्हायरमुळे? कदाचित नाही.

एका व्हायरसने नव्हे तर जगातल्या दोन सर्वात शक्तिशाली देशांनी संपूर्ण जगाच्या आत्मविश्वासाला तडा लावला आहे. हूवर इंस्टिट्यूशनचे अमेरिकन इतिहासकार नेल फर्ग्यूसन या दोन्ही देशांना चिमेरिका म्हणतात.

मागच्या एका दशकापासून किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून चीन आणि अमेरिकेने आर्थिक संबंधांचं मॉडेल विकसित केलं आहे. याची तुलना फर्ग्यूसन निचेबेई म्हणजेच मागच्या शतकाच्या शेवटपर्यंत असलेल्या अमेरिका-जपान यांच्या आर्थिक संबंधांशी करतात. कोरोना व्हायरसने याच चिमेरिकाला काल्पनिक व्याख्येत बदललं आहे.

चीनचे तीन सिद्धांत

चीनी नेत्यांवर जगापासून सत्य लपवल्याचे आरोप लावण्यात येत आहेत. यामुळेच हा व्हायरस दुसऱ्या देशांपर्यंत पोहोचू शकला आणि त्याने महामारीचं स्वरूप घेतलं.

चीनच्या दाव्यांना आव्हान दिलं जात आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार तिथं कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णांची संख्या 82 हजार आहे, तर 4500 लोकांचा मृत्यू झालेला आहे.

पण चीनमधल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 29 लाखांपर्यंत असू शकते, असं वॉशिंग्टनमधील एक संस्था अमेरिकन इंटरप्राईज इंस्टिट्यूटचे डेरेक सिझर्स म्हणतात.

सध्याचा चीन आपल्या देशात ऐतिहासिक ठेव्याचा स्वीकार केल्याचं सांगतो. चीन एका मोठ्या क्रांतीतून तयार झालेला आहे. या क्रांतीनंतरच माओने 1949ला चीनची सत्ता हस्तगत केली होती.

जगाबाबत चीनचा दृष्टिकोन तीन प्रमुख सिद्धांतामधून दिसू शकतो - GDPवाद, चीनला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न आणि स्वतःबाबत असलेला असामान्य क्षमतेचा समज.

हे तिन्ही सिद्धांत माओच्या क्रांतीतूनच समोर आले होते. डांग शिआयो पिंग यांनी 1980ला घोषणा केली की सर्वात महत्त्वपूर्ण सिद्धांत आर्थिक विकास आहे, पण चिनी अर्थशास्त्रज्ञ याला GDPवाद म्हणतात.

दुसरा सिद्धांत चीनला केंद्रस्थानी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आहे.

माओ यांनी स्वातंत्र्य, स्वायत्तता आणि सार्वभौमत्व यांच्यावर भर दिला होता. वँग शेन यांनी संगीत दिलेलं एक लोकप्रिय चिनी देशभक्तिपर गाणं गेचांग जुगुओमध्ये पर्वत, पढार आणि यांगत्से आणि हवेंग नदीवर वसलेल्या या विशालयकाय चीनला आपला देश संबोधण्यात आलं आहे. हे गीत प्रत्येक चीनी व्यक्तीच्या आयुष्याशी निगडित आहे.

तिसरा सिद्धांत चीनच्या असामान्य सामर्थ्याबाबत आहे. दुसऱ्यांकडून काहीएक शिकण्यावर चीनचा विश्वास नाही.

क्रांतीच्या वेळी माओने दिलेल्या आदेशाचं चीन पालन करतो. आपल्या समस्यांवरचा उपाय स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरच शोधण्याचा चीनी नेत्यांचा प्रयत्न असतो.

आशियाई देश कोरोना व्हायरसशी लढण्यात उत्तम

ऐतिहासिक समानता प्रत्येकवेळीच बरोबर असू शकत नाहीत. चीनचा राष्ट्रवादी दृष्टिकोन काही प्रमाणात दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या जर्मनीशी मिळताजुळता आहे.

वांशिक श्रेष्ठता, ऐतिहासिक दावे आणि आर्यांची असामान्य क्षमता या गोष्टी जगाला 1930 मध्ये चांगल्याच परिचित होत्या. अनेक देशांसाठी ती साधारण गोष्ट होती.

हिटलरने पूर्व झेकोस्लोव्हाकियातील जर्मन बोलणाऱ्या सुडेटनलँड भागावर कब्जा केला तेव्हा युरोपने हिटलरला आव्हान देण्याऐवजी त्याचं कौतुक करण्याचा निर्णय घेतलाय रुझवेल्ट दूरूनच हे पाहत होते. तर ब्रिटन, फ्रान्स आणि इटली म्यूनिक कराराअंतर्गत हिटलरचा विजय साजरा करत होते.

“मला विश्वास आहे जगभरातील लाखो लोक तुमच्या कार्याला मानवतेसाठी केलेल्या ऐतिहासिक सेवेसाठी ओळखतील,” असं अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी हिटलरचं कौतुक करताना म्हटलं होतं

पण हिटलरने एका वर्षाच्या आतच आपल्या शब्दापासून फारकत घेत आक्रमकता दाखवणं सुरू केलं, यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. यामुळेच दुसरं महायुद्ध सुरू झालं.

1939-40 मध्ये जी स्थिती ब्रिटनची होती, तीच स्थिती आज अमेरिकेची आहे. जागी होण्यापूर्वीच ट्रंप यांनी कोरोना व्हायरसला अमेरिकेत धुमाकूळ माजवण्याची परवानगी दिली आहे. 28 फेब्रुवारीला ट्रंप साऊथ कॅरोलिनामध्ये आपल्या समर्थकांना या महासाथीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगत होते.

कोरोनाचा धोका चुकीचा ठरेल, असं सांगत या संकटाचा इशारा म्हणजे माध्यमांनी तयार केलेला बुडबुडा आहे, असं ते म्हणाले होते.

तर दुसरीकडे बेल्ट अँड रोडचा लाभ घेण्यासाठी चीनपर्यंत पोहोचणारे युरोपियन देश आता महामारी रोखण्यासाठी संघर्ष करत आहेत.

या संसर्गजन्य रोगाचा सामना करत असलेल्या देशांमध्ये बहुतांश देश आशियाई लोकशाही देश आहेत. दक्षिण कोरिया याचं नेतृत्व करत आहे. हा देश आपल्या लोकसंख्येने सहापट मोठ्या असलेल्या अमेरिकेपेक्षाही जास्त चाचण्या घेत आहे.

सिंगापूरने चाचणीच्या माध्यमातून महामारीवर अंकुश लावण्यात यश मिळवलं आहे. हाँगकाँग आणि तैवान यांनी सार्स व्हायरसच्या अनुभवातून बोध घेऊन कोरोना व्हायरसविरुद्ध परिणामकारक पावलं उचलली आहेत.

चांगल्या लढ्याची अपेक्षा

तर दुसरीकडे भारताने कोरोना व्हायरसला लढा देण्यासाठी सक्रिय लोकशाहीचं उदाहरण समोर ठेवलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकारांसोबत मिळून लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात यश मिळवलं आहे.

मोदी पुढे येऊन नेतृत्व करत आहेत आणि त्यांना लोकांचा संपूर्ण पाठिंबा आहे. 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात आतापर्यंत 21 हजारपेक्षाही जास्त लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कोणताच मनमानी निर्णय घेतलेला नाही.

किंबहुना त्यांच्यावर इस्लामोफोबियासारखे आरोप आणि इतर चुकीच्या गोष्टी पसरवण्याचे प्रयत्नही झाले. पण त्यांच्या मोदी यांनी सामना केला. यावेळी त्यांनी गांभीर्य, संयम आणि आशावादी दृष्टिकोन दाखवला आहे.

दूरगामी नेतृत्व करणारी लोकशाही उदारमतवादी धोरणांशी समझोता न करता अशा प्रकारच्या आव्हानांचा सामना करू शकते, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.

सध्या एक नवीन वैश्विक रचना आकार घेत आहे. त्यामध्ये भारत, अमेरिका आणि जर्मनीसारखे देश मिळून पंतप्रधान मोदी यांनी सुचवलेल्या मनुष्यबळ विकास सहयोगाच्या आधारावर नवं जग निर्माण करण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

ही वेळ एका नव्या अटलांटिक चार्टरची आहे. पर्यावरण, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि लोकशाही उदारमतवाद नव्या अटलांटिक चार्टरचे मुद्दे असू शकतात.

आज चीनकडेही एक संधी आहे. जगभरात त्यांच्यावर टीका होते आहे. देशांतर्गतही गदारोळ माजला आहे. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाला सातत्याने आव्हान दिलं जात आहे.

त्यामुळे डेंग यांच्या सूचनेकडे चीनने लक्ष दिलं पाहिजे, आणि "नदी पार करण्यासाठी दगडं कुठे आहेत, याची चाचपणी करायला पाहिजे". चिनी कम्युनिस्ट पक्षाची एक म्हण आहे - 'Luxian Douzheng' म्हणजेच लाईन स्ट्रगल किंवा रांगेतला संघर्ष.

काही लोकांसाठी हा एक सत्तासंघर्षही असतो. पण हा नवा पक्ष जगण्यासाठीचा संघर्ष दर्शवतो. भूतकाळात असे अनेक संघर्ष झाले आहेत. पण यावेळी एका चांगल्या संघर्षाची अपेक्षा जगाने करावी का?

(लेखक भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. लेखातले विचार त्यांचं वैयक्तिक मत आहे)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)