वाघांच्या दहशतीत लेकरांना शाळेत नेणाऱ्या चंद्रपुरातील धाडसी महिला - ग्राऊंड रिपोर्ट

व्हीडिओ कॅप्शन, वाघांच्या दहशतीत शाळेचा रस्ता: 4 महिलांचा धाडसी पुढाकार
वाघांच्या दहशतीत लेकरांना शाळेत नेणाऱ्या चंद्रपुरातील धाडसी महिला - ग्राऊंड रिपोर्ट

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा जंगलालगतच्या गावांमध्ये वाघांचा वावर दिवस-रात्र वाढला आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना रस्त्यात वाघ दिसण्याच्या घटनांमुळे भीतीचं वातावरण आहे.

सितारामपेठ गावातील चार महिलांनी पुढाकार घेत मुलं आणि मुलींना शाळेपर्यंत सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी घेतली. 400 मीटरच्या निर्जन रस्त्यावर, शेत आणि जंगलाच्या मधोमध या महिला सकाळ-संध्याकाळ टॉर्च आणि आरडाओरड करत मुलांना बसस्टॉपपर्यंत सोडतात.

मुलं-मुली, पालक आणि महिलांच्या अनुभवांमधून वाघांच्या दहशतीचं वास्तव समोर येतं. महिलांच्या या धाडसी भूमिकेची दखल घेत वन विभागानं हा उपक्रम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 105 गावांत राबवण्याचा निर्णय घेतला आहे.