सेक्स आरोग्यः पॉर्न व्हीडिओ सार्वजनिक ठिकाणी का पाहिले जातात?

फोटो स्रोत, Getty Images
ब्राऊनन रीड एका लायब्ररीत बसल्या होत्या. इतर विद्यार्थ्यांसारख्या त्याही अभ्यास करत होत्या. मात्र, एका क्षणी एक मुलगा लायब्ररीच्या कॉम्प्युटवर पॉर्न पाहत असल्याचं त्यांना दिसलं.
"मला ते पाहून प्रचंड धक्का बसला. मला काय करावं हेच कळलं नाही," त्या बीबीसीशी बोलताना सांगत होत्या.
मँचेस्टरमधल्या त्या 21 वर्षांच्या ब्राऊनन यांना वाटलं की ही अपवादात्मक परिस्थिती आहे. पण नंतर काही आठवड्यातच हा प्रकार पुन्हा त्यांच्या निदर्शनास आला.
ब्राऊनन यांच्यासारखेच अनेकांना असेच अनुभव आले. सार्वजनिक ठिकाणी, बसेसमध्ये पुरुष पॉर्न पाहत असल्याचं अनेकांनी सांगितलं.
इंग्लंडमधला एक खासदार संसदेत फोनवर पॉर्न पाहत असताना दिसले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. हा प्रकार चुकून झाल्याचं ते म्हणाले. त्यांनी ट्रॅक्टर पाहण्यासाठी वेबसाईट उघडली होती. त्यांना पॉर्न पाहायचं नव्हतं.
ऑफकॉम या वेबसाईटनुसार इंग्लंडमध्ये अर्ध्याहून अधिक लोक पॉर्न पाहतात.

फोटो स्रोत, Bronwen Reed
लोक खासगीपणे पॉर्न पाहण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी का पाहतात, याविषयी आम्ही मनोविकारतज्ज्ञ डॉ. पॉला हॉल यांच्याशी संवाद साधला. सेक्स आणि पॉर्नोग्राफीचं व्यसन या विषयात त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांनी या वर्तनाचं काही कारणं सांगितली.
व्यसन
डॉ. हॉल यांच्या मते, व्यसन हे एकमेव कारण आहे.
"एखाद्या गोष्टीचं व्यसन लागलं की मग कोणत्याही गोष्टीचा संयम राहत नाही हे आपल्याला माहिती आहेच. दारू, गेमिंग किंवा जुगार काहीही असलं तरी एकदा संयम सुटला की सगळं व्यर्थ असतं," त्या सांगतात.

फोटो स्रोत, Emma Hermansson
पॉर्न पाहण्याची इच्छा इतकी प्रबळ होते की, आपण घरी गेल्यावर पाहू अशी समजूत लोक काढू शकत नाहीत. जेव्हा एखाद्या गोष्टीचं व्यसन लागतं तेव्हा विचार करण्याची क्षमता आपोआपच कमी होते.
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक
कॉलम सिंगल्टन एकदा बसने ग्लासगोला जात होते. तेव्हा त्यांना एक माणूस पॉर्न बघताना दिसला. 19 वर्षांच्या कॉलम यांना ते पाहून किळस आली. सार्वजनिक ठिकाणी असं कोण का करेल याचा त्याला उलगडा झाला नाही.
"हे सगळीकडेच आढळतं. हा प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग आहे असं वाटतं. पण खरं तर असं नसावं," तो पुढे सांगतो.
हॉल यांच्या मते, स्वत:च्या सवयीबद्दल सजग नसणं हेही यामागचं एक कारण आहे. एका क्षणी ते Ebay किंवा फेसबुक पाहत असतात आणि दुसऱ्या क्षणी एखादी लिंक उघडून ते पॉर्न पाहतात.
पॉर्न पाहण्यात आता कोणाला वावगं वाटत नाही. आता तो लोकांच्या संस्कृतीचा भाग झाला आहे.
पॉर्न आता सहज उपलब्ध आहे. त्यात काय असतं आणि काय नाही असले प्रश्नही आता लोकांना पडत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
जेव्हा लोक पॉर्न पाहतात तेव्हा त्यांना असं वाटतं की, आजूबाजूचेही लोक तेच करत आहेत. म्हणूनच ते पाहताना कोणालाच काही वाटत नाही.
हॉल म्हणतात, सार्वजनिक ठिकाणी पॉर्न पाहणं हे एका विशिष्ट वर्गासाठी अधिकारवाणीचा भाग आहे असं वाटतं. मला हे सगळं पाहण्याचा अधिकार या विचारामागे एक प्रकारची पुरुषी मानसिकता आहे.
सवय
जर एखाद्याला तरुण वयापासून पॉर्न बघायची सवय असेल तर त्याचाही हा परिणाम असू शकतो असं हॉल म्हणतात.
"आपण एखाद्या गोष्टीला कोणत्या वयापासून सुरुवात करतो, त्यालाही महत्त्व आहे. मग एका टप्प्यानंतर त्या आपोआप घडायला लागतात. ही सवय आहे हेही अनेकदा लक्षात येत नाही, त्यामुळे ती मोडण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही," असं पॉल म्हणतात.
ब्राऊनन यांना मात्र सार्वजनिक ठिकाणी पॉर्न पाहणं हा चिंताजनक विषय वाटतो. कारण सार्वजनिक या शब्दातच ती जागा सर्वासाठी आहे असा अर्थ अभिप्रेत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांना सुखकर वाटायला हवं. पण असं बरेचदा होत नाही.
डॉ. हॉल म्हणतात, "स्वत:विषयी सजग नसलं की हे प्रकार वारंवार होतात. त्यामुळे त्याचा इतरांना त्रास होतो हे त्यांच्या गावीही नसतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








