You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इ आधार कार्ड डाउनलोड: आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत मोबाईलवर कशी मिळवायची?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
एखाद्या सरकारी योजनेत सहभाग घ्यायचा असेल, बँकेत खातं उघडायचं असेल, शाळेत प्रवेश घ्यायचा असेल, घर खरेदी करायचं असेल किंवा इतर काही काम करायचं असेल तर एक डॉक्युमेंट आवश्यक असतं.
ते म्हणजे आधार कार्ड. आता याच आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत अवघ्या 5 मिनिटांत तुम्ही घरबसल्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता.
ते कसं, त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत.
ई-आधार
आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत मिळवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला uidai असं सर्च करायचं आहे. त्यानंतर 'युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया' नावानं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
यातल्या uidai वर क्लिक केलं की आधारची वेबसाईट तिथं ओपन होईल.
इथं Get Aadhaar नावाचा पहिला पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक केलं की, Download Aadhaar नावाचा एक पर्याय तिथं तुम्हाला दिसेल.
इथं तुम्ही तुमच्या आधार कार्डाची इलेक्ट्रॉनिक प्रत मिळवू शकता.
त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर 'कॅप्चा' टाकून 'सेंड ओटीपी' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जाईल, तो इथं टाकायचा आहे.
त्यानंतर तिथं असलेल्या एका सर्व्हेत तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. इथल्या दोन प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहे.
1. Did you know that you can order Reprint of Aadhaar letter from UIDAI website?
आधारच्या वेबसाईटवरून तुम्ही आधार लेटरची प्रिंट देऊ शकता, हे तुम्हाला माहिती आहे का, असा हा पहिला प्रश्न आहे.
2. In how many days did you receive the Reprinted Aadhaar Letter after getting SMS from India Post?
इंडिया पोस्टकडून मेसेज आल्यानंतर किती दिवसांत आधार लेटरची प्रिंट तुम्हाला मिळते, हे माहिती आहे का, असा दुसरा प्रश्न आहे.
त्यानंतर व्हेरिफाय अँड डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करायचं आहे. पण हे करण्यापूर्वी इथं दिलेली सूचना वाचणं गरजेची आहे.
"The Aadhaar electronic copy is a password protected document" अशी ही सूचना आहे. याचा अर्थ पासवर्ड टाकल्याशिवाय तुमच्या आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत उघडली जाणार नाही.
आता हा पासवर्ड 8 कॅरॅक्टर्सचा असावा, असं इथं सांगितलं आहे.
यात आधार कार्डवरील तुमच्या नावाची पहिली 4 अक्षरं कॅपिटल लेटरमध्ये जशीच्या तशी लिहायची आहे आणि याला जोडून जन्माचं वर्ष टाकायचं आहे.
आता समजा माझं आधार कार्डवरील नाव Satish Patil असं आहे आणि जन्मतारिख 1990 आहे. तर माझा पासवर्ड SATI1990 असा होईल.
एकदा हा पासवर्ड ठरवून झाला की मग व्हेरिफाय अँड डाऊनलोड यावर क्लिक करायचं. त्यानंतर आधार कार्डची पीडीएफ फाईल डाऊनलोड होईल.
या फाईलवर क्लिक केलं की तिथं तुम्हाला पासवर्ड टाकून ओकेवर क्लिक करावं लागेल. त्यानंतरच आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत तुमच्यासमोर ओपन होईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)