निर्मला सीतारामण : कोव्हिडग्रस्त भागांसाठी 1.1 लाख कोटींची कर्ज हमी योजना

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नव्यानं काही योजना जाहीर केल्या आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यासंबंधीची पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी आरोग्य, पर्यटन, शेती अशा वेगवेगळ्या घटकांसाठी आर्थिक तरतूदीची घोषणा केली.

आरोग्य

कोव्हिडग्रस्त भागांसाठी 1.1 लाख कोटींच्या क्रेडिट गॅरंटी योजनेची (कर्ज हमी) घोषणा करण्यात आली आहे.

आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. या निधीचा वापर आरोग्यविषयक सुविधांच्या उभारणीसाठी होणार आहे.

पर्यटन

आंतरराष्ट्रीय प्रवास पूर्ववत झाल्यानंतर भारतात येणाऱ्या पहिल्या 5 लाख परदेशी व्यक्तींना व्हिसासाठीचं शुल्क द्यावं लागणार नाही.

31 मार्च 2022 पर्यंत ही योजना लागू असेल. एका परदेशी व्यक्तीला एकदाच या योजनेचा फायदा घेता येईल.

देशातील सगळ्या ग्रामपंचायतींपर्यंत ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी 19 हजार 41 कोटी रुपये अधिक देण्याची घोषणाही सीतारामण यांनी केली.

तर खतांसाठी जे 85 हजार 413 कोटी रुपयांचं अनुदान दिलं, त्यात 14 हजार 775 कोटी रुपयांचं अधिक अनुदान जाहीर करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांना प्रोटीन-बेस्ड खतांवर अधिकचं 15 हजार कोटी रुपयांचं अनुदान दिलं जाईल, असं अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केलं आहे.

मोदींनी केलं कौतुक

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केलेल्या घोषणांमुळे ज्यांच्यापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचल्या नाहीत, त्यांच्यापर्यंत त्या पोहोचतील.

तसंच वैद्यकीय क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढेल, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सीतारामण यांचं कौतुक केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)