कोरोना मुंबई : लॉकडाऊनमध्ये शिथिलतेचा आदेश मागे, केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू

फोटो स्रोत, ANI
मुंबईत वाढलेली गर्दी लक्षात घेता शिथील केलेले नियम मागे घेण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हे आदेश दिलेत.
लॉकडाऊन शिथील करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने 4 मे पासून काही अटी शिथिल करून काही महत्त्वाच्या सेवा सुरू करायला परवानगी दिली होती. परंतु या शिथिलीकरणात लोक अपेक्षित असलेली शिस्त पाळत नसल्यामुळे मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील, असे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत.
त्यामुळे मुंबईत किराणा आणि औषधांची सोडून सर्व दुकानं पुन्हा बंद होणार आहेत.
इतक्या दिवसांपासून आपण घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते. सबब अशा परिस्थितीत शासनाने पालिका आयुक्तांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून, उद्यापासून (6 मे) मुंबईत फक्त पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवाच फक्त सुरू राहतील, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
मॉल्स, मार्केट्स संकुलं, मार्केट्स बंद राहतील. फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकानं सुरू राहतील, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
सोमवारी दारू विक्रीची दुकानं उघडल्यामुळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रेड झोन अर्थात कोरोना संसर्गाचा धोका असणाऱ्या मुंबईत अशी गर्दी होणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे आयुक्तांनी दारूविक्रीच्या दुकानांना दिलेली परवानगी रद्द केली आहे.
केवळ किराणा, भाजीपाला, दूध, मेडिकल यांचीच दुकानं खुली राहतील.
(ही बातमी सतत अपडेट होते आहे)

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








