करण जोहरच्या पार्टीत सेलिब्रिटींनी ड्रग्ज घेतल्याचा आरोप : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. 'उडता बॉलीवूड': करण जोहरच्या पार्टीवरून रंगलं राजकारण
बॉलीवुडमधील दिग्दर्शक करण जोहरने दिलेल्या एका पार्टीवरून आता चांगलंच राजकारण रंगलं आहे. दीपिका पदुकोण, रणबिर कपूर, विकी कौशल, अर्जून कपूर, मलाइका अरोरा, शाहीद कपूर, चित्रपट निर्माते अयान मुखर्जीसारखे सिनेसृष्टीतील तारे-तारका उपस्थित असलेल्या या पार्टीचा व्हीडिओ करण जोहरने सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या व्हीडिओमध्ये सर्व सेलिब्रिटी ड्रग्जच्या नशेत आहेत, असे ट्वीट शिरोमणी अकाली दलाचे आमदार मजिंदर सिरसा यांनी केले. त्यामुळे निर्माण झालेल्या वादात काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही उडी घेतली आहे.
त्यामुळे हे प्रकरण वाढण्याची शक्यता दिसत आहे. सिरसा यांच्या ट्विटला देवरा यांनी ट्वीटरवरून उत्तर देऊन माफी मागा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
देवरा यांनी "माझी पत्नीही या पार्टीत आणि व्हीडीओत आहे. तिथं कुणीही ड्रग्ज घतलं नव्हतं. आपल्याला माहिती नसलेल्या लोकांबद्दल असत्य माहिती पसरवणे थांबवा. तुम्ही स्वतः बिनशर्त माफी मागाल ही अपेक्षा" असं ट्वीट त्यांनी केलं आहे. इंडिया टुडेने याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध केली आहे.
2. वाहतुकीचे नियम मोडाल तर...
बहुचर्चित मोटर वाहन दुरुस्ती विधेयक-2019 राज्यसभेतही मंजूर झाले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडले आणि ते 13 विरुद्ध 108 अशा फरकाने मंजूर झालं.

फोटो स्रोत, Getty Images
वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकानुसार करण्यात आली आहे.
हेल्मेटविना प्रवास करणाऱ्या व्यक्तीला आता 100 रुपयांऐवजी आता 1000 रूपये दंड द्यावा लागणार आहे. तसंच चालकाचं लायसन्सही जप्त करण्यात येणार आहे.
दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यास 10 हजार दंड भरावा लागेल तर मोबाइलवर बोलत गाडी चालवल्यास 5 हजार रुपयांचा दंड होणार आहे. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
3. जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस
जुलै महिन्यात देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे देशातील पावसाची तूट कमी होऊन ती उणे नऊपर्यंत आली आहे. पुढचे दोन आठवडेही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जुलैमध्ये 298.3 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे.

फोटो स्रोत, INDIAN NAVY
असं असलं तरी झारखंड, दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, अंदमान-निकोबार बेटे, हिमाचल प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्र टाइम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
4. बॅंकेच्या इमारतीचा स्लॅब कोसळून 1 ठार
सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे एका व्यक्तीचे प्राण जाण्याची घटना बुधवारी घडली. प्रशांत बागल असं या व्यक्तीचं नाव असून ते प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते.
बुधवारी सकाळी अचानक या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळला, त्यामुळे बँकेचे कर्मचारी आणि ग्राहक असे 25 ते 30 लोक त्याखाली अडकले होते. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
5. मुलाच्या तोंडातून काढले 500 पेक्षा जास्त दात
चेन्नईमध्ये सात वर्षांच्या एका मुलाच्या तोंडातून 526 दात काढण्यात आले आहेत. चेन्नईमधील सविता डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली आहे. रविंद्रन असं या मुलाचं नाव आहे. द हिंदूने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
या सर्व दातांचं एकूण वजन 200 ग्रॅम इतकं असून त्यातील बहुतांश दात अत्यंत लहान आकाराचे आणि बाकीचे दात मध्यम आणि मोठ्या आकाराचे होते.
इतक्या मोठ्या प्रमाणात दात काढण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. यापूर्वी मुंबईमध्ये 2014 साली झालेल्या एका शस्त्रक्रियेमध्ये 17 वर्षं वयाच्या एका मुलाच्या तोंडातून 232 दात काढण्यात आले होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








