फोटो - मेक्सिकोत 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचा विध्वंस

मेक्सिकोमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर क्षमतेची होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य मेक्सिकोतील प्वेबेला परिसरात होता.

भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भूकंपानंतर काही इमारतींना आग लागल्याच्या घटना घडल्या. मेक्सिको सिटीच्या महापौरांनी ही माहिती दिली आहे.
भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भूकंपामुळे हाहाकार उडल्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासनानं नागरिकांना शांतता राखण्याचं आणि सहकार्याचं आवाहन केलं आहे.
भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भूकंपानंतर नागरिक भांबावलेल्या अवस्थेत रस्त्यांवर उभे आहेत.
भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 32 वर्षांपूर्वी मेक्सिकोमध्ये आलेल्या भूकंपात 10 हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले होते.
भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनेक इमारतींना तडे गेल्यानं इमारतींची तपासणी झाल्यावरच इमारतींमध्ये प्रवेश करा असं अधिकारी नागरिकांना सांगत आहेत.
भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जखमींना रूग्णालयात पोहचवलं जात आहे.
भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुपारचे जेवण सुरू असतानाच मेक्सिको सिटीमध्ये भूकंपाचा हादरा बसला. त्यामुळे आहे त्या स्थितीत नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली.
भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्थानिक नागरिकांनी इमारतींचे कोसळलेले अवशेष हटवण्यास तत्काळ सुरूवात केली आहे.
भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीला भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे.
भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इमारतींच्या अवशेषांखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.