ओशो : मध्य प्रदेशचे चंद्रमोहन जैन 'आचार्य रजनीश' कसे बनले? जाणून घ्या प्रवास

व्हीडिओ कॅप्शन, ओशो : मध्य प्रदेशचे चंद्रमोहन जैन 'आचार्य रजनीश' कसे बनले? जाणून घ्या प्रवास
ओशो : मध्य प्रदेशचे चंद्रमोहन जैन 'आचार्य रजनीश' कसे बनले? जाणून घ्या प्रवास

भारतात असताना लाखो अनुयायी त्यांना 'ओशो' म्हणायचे. पण भारतातून बाहेर पडल्यानंतर जगभरात ते 'आचार्य रजनीश' आणि 'भगवान श्री रजनीश' या नावाने ओळखले जाऊ लागले.

‘ओशो’ शब्दाचा अर्थ होतो - स्वत:ला महासागरात विलीन केलेली व्यक्ती.

ओशो यांचा मृत्यू होऊन जवळपास 33 वर्षे झाली. पण आजही त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची विक्रमी संख्येत विक्री होते, त्यांचे व्हीडिओ आणि भाषणांचे ऑडिओ आजही सोशल मीडियावर पाहायला आणि ऐकायला मिळतात.