आतड्याचा कॅन्सर ओळखण्यासाठी विष्ठेची तपासणी कशी करावी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फिलिपा रॉक्सबी
- Role, आरोग्य प्रतिनिधी
आतड्याच्या कॅन्सरचं प्रमाण थांबवण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत.
यासाठी आधीच कोणती काळजी घ्यावी हे सांगणारी माहिती सर्वत्र प्रसारित केली जात आहे. हा आजार आधीच कसा ओळखायचा, डॉक्टरांकडे कधी जाणं आवश्यक आहे, घरच्याघऱी कोणती निरिक्षणं केलं जाऊ शकतात याची माहिती असणं आवश्यक आहे.
आरोग्यासंदर्भातील बहुतेक माहितीमध्ये इंग्रजी शब्द वापरलेले असतात. त्यामुळे काही शब्दांचा अर्थ माहिती असणं आवश्यक असतं. त्यासाठी आपण काही इंग्रजी शब्द व त्यांना मराठीत काय म्हणतात ते पाहू. कॅन्सर-कर्करोग, बाऊल- आतडं, रेक्टम- गुदाशय, फिसिज-विष्ठा, पू- विष्ठा.
आतड्याचा कॅन्सर कसा ओळखायचा?
हे शोधण्यासाठी तीन मुख्य गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
- कोणत्याही विशेष कारणाविना विष्ठेमध्ये रक्त दिसत असेल तर. हे रक्त गडद लाल रंगाचे असते.
- शौचालयात जाण्याची पद्धत बदलणे म्हणजे सतत जावं लागणं किंवा विष्ठा अतिपातळ किंवा अती घट्ट होणं.
- ओटीपोटात दुखणं किंवा पोट फुगणं.
- याशिवाय इतर लक्षणंही आहेत
- तुमचं वजन कमी झालं असेल तर
- शौचालयातून बाहेर आल्यावरही पोट रिकामं झाल्यासारखं वाटत नसेल तर
- पूर्वीपेक्षा जास्त दमल्यासारखं वाटणं, चक्कर येत असेल तर
ही लक्षणं असणं म्हणजे तुम्हाला आतड्याचा कॅन्सरच झालेला असेल असं नाही पण तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ ती दिसत असतील आणि तुम्हाला सगळं काही ठीक नाहीये असं वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे.
याचा अर्थ तुम्ही लवकरात लवकर तपासणी करुन घेणं गरजेचं आहे. कर्करोगाचं जितकं लवकर निदान होईल तितक्या सोप्या पद्धतीनं उपचार करता येतील.

फोटो स्रोत, Getty Images
कधीकधी या आतड्याच्या कर्करोगात पोटातला मल पुढे सरकणं बंद होतं आणि तेथे अडथळा तयार होतो. त्यामुळे पोटात तीव्र वेदना, बद्धकोष्ठ आणि मळमळीने आजारपण येऊ शकतं. अशा स्थितीत तात्काळ डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे.
विष्ठेची तपासणी कशी करायची?
- आपल्या विष्ठेची तपासणी करुन त्याबद्दल बोलायला लाजू नये.
- विष्ठेमध्ये रक्त दिसतंय का ते पाहावं, गुदद्वारातून रक्त येतंय का पाहावं.
- गुदद्वाराजवळच्या सुजलेल्या वाहिन्यांतून (मुळव्याधाप्रमाणे) गडद रक्त येऊ शकतं, पण तो आतड्याचा कर्करोग असू शकतो.
- गडद रक्त किंवा काळसर रक्त आतड्यातून किंवा पोटातून बाहेर येऊ शकतं, ही सुद्धा काळजीची गोष्ट ठरू शकते.
- विष्ठा पातळ किंवा वारंवार शौचालयात जावं लागणं असे बदलही दिसून येतात.
- वारंवार जाऊनही पोट साफ होत नसल्यासारखं वाटणं
आतड्याचा कॅन्सर का होतो?
आतड्याचा कॅन्सर नक्की कशामुळे होतो याची निश्चित कारणं माहिती नाहीत पण काही गोष्टींमुळे तो वाढत असावा-

फोटो स्रोत, Getty Images
- वय जास्त असेल तसं कर्करोगाचं प्रमाणही वाढतं. आतड्याचा कर्करोगही 50 वर्षांच्या वरील वयाच्या लोकांमध्ये दिसून येतो.
- लाल मांस किंवा प्रक्रिया केलेलं मांस जास्त खाणं, सॉसेजेस, बेकन, सलामी यांचं प्रमाण जास्त असणं
- सिगारेट्समुळे अनेक प्रकारचे कर्करोग होऊ शकतात
- वजन जास्त असणं किंवा लठ्ठपणा (ओबेसिटी)
- पूर्वीपासून आतड्यात आतल्या बाजूस मांसल कोंब येण्याचा इतिहास असेल तर त्याचं रुपांतर गाठीत होण्याची शक्यता असते.
हा आजार अनुवंशिक आहे का?
- हा आजार एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जात नसल्याचं अनेकवेळा दिसतं. पण तुमच्य जवळच्या नातलगाला पन्नाशीच्या आत हा कर्करोग झाला असेल तर तुम्ही तसं डॉक्टरकडे गेल्यावर सांगितलं पाहिजे.
- लिंच सिंड्रोमसारखी अनुवंशिक स्थिती असेल तर आतड्याचा कर्करोग होण्याची भीती जास्त आहे पण वेळीच डॉक्टरांना सांगितल्यास लवकर उपचारही सुरू करता येतात.
आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका कसा कमी करायचा?
- आरोग्यदायी जीवनशैलीने हा कॅन्सर बहुतांश रोखता येतो असं शास्त्रज्ञ सांगतात.
- याचाच अर्थ व्यायाम करणं, भरपूर फायबर्स म्हणजे तंतूमय पदार्थ खाणं, फॅट्स किंवा स्निग्धपदार्थ कमी खाणं आणि दररोज सहा ते आठ पेले पाणी पिणं असा होय.
- डॉक्टरांना भेटून, तपासणीअंती योग्य उपचार घेणं अत्यंत आवश्यक आहे.
कोणत्याही प्रकारचे उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे. तसेच इंटरनेटवरील माहिती वाचून आरोग्यासंदर्भातील निर्णय कधीही घेऊ नये.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








