पराग अगरवाल : ट्विटरच्या माजी सीईओंच्या 11 वर्षं जुन्या ट्वीटवरून वाद का झाला होता?

पराग अगरवाल

फोटो स्रोत, Twitter

इलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्सला ट्विटर विकत घेतलं आहे. या वृत्तानंतर ट्विटरचे मुख्य अधिकारी आणि वित्तीय अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांची नोकरी सोडली आहे.

इलॉन मस्क यांनी आधी ट्विटरला विकत घेण्याची ऑफर दिली होती, पण नंतर ती मागे घेतली. त्यानंतर ट्विटरनं कायदेशीर कारवाई करत मस्क यांना ट्विटर विकत घेण्यास भाग पाडलं आहे. आता हा व्यवहार पूर्ण झाल्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे.

पैसै कमावण्यासाठी ट्विटर विकत घेत नसल्याचं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे.

जवळपास वर्षभरापूर्वी पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ बनले होते. ते इतक्या मोठ्या कंपनीचे सीईओ बनल्यानंतर त्यांच्याबाबत ट्विटरच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी चर्चा सुरू झाली होती. ते भारतीय वंशाचे आहेत, आयआयटी बॉम्बेमधून शिकलेले आहेत, अशी बरीच माहिती समोर येऊ लागली होती.

त्यानंतर पराग अग्रवाल यांचं आणखी एका ट्वीटची, जे दहा वर्षांपूर्वीचं होतं, त्याचीही बरीच चर्चा रंगली होती. ते ट्वीट ट्रोलर्सनं शोधून काढलं होतं. त्यात पराग अगरवाल यांनी मुस्लीम, कट्टरतावादी, श्वेतवर्णीय आणि वर्णभेदाबाबत मत मांडलं होतं.

पराग अगरवाल यांच्या या ट्वीटचे एका दशकानंतर विविध प्रकारचे अर्थ काढले जात आहेत. मात्र त्यांनी या ट्वीटबाबत तेव्हाच स्पष्टीकरणही दिलं होतं.

ट्वीटमध्ये काय आहे?

पराग अगरवाल यांनी 26 ऑक्टोबर 2010 ला एक ट्वीट केलं होतं. त्यावेळी ते ट्विटरबरोबर काम करत नव्हते.

"जर मुस्लीम आणि कट्टरतावाद्यांमध्ये त्यांना फरक समजत नसेल, तर मी श्वेतवर्णीय आणि वर्णभेद करणाऱ्यांमध्ये फरक का समजू?" असं त्यांनी त्यावेळी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

त्यांच्या सीईओ बनण्याच्या घोषणेनंतर एक दशक जुन्या या ट्वीटवर अनेक दिग्गजांनीही कमेंट केल्या आहेत. मात्र त्यांनी आधीच याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं.

पराग अगरवाल

फोटो स्रोत, LINKEDIN/PARAG AGRAWAL

कॉमेडियन आसिफ मांडवी यांनी 'डेली शो' दरम्यान असं म्हटलं होतं आणि तेच त्यांनी ट्वीट केलं, असं त्यांनी सांगितलं होतं. या कार्यक्रमात अनेक विनोदी कलाकारांनी भाग घेतला होता. त्यात कृष्णवर्णीयांच्या अधिकाराबाबत चर्चा होत होती.

पराग यांच्याबाबत तीव्र प्रतिक्रिया

उजव्या विचारसरणीचे ट्रोल्स सातत्यानं ट्विटरवर त्यांना सेन्सॉर केलं जात असल्याच्या मुद्द्यावरून टीका करत आहेत. पराग अगरवाल यांच्या जुन्या ट्वीटवरून लोकांनी ट्विटरवरही हल्लाबोल केला आहे.

अमेरिकेच्या टेनिसी येथील सिनेटर आणि रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या मार्शा ब्लॅकबर्न यांनी हे 11 वर्षे जुनं ट्वीट रिट्वीट केलं आहे. "ट्विटरच्या नव्या सीईओंनी धर्माला पिरॅमिड स्किम ठरवलं आहेत. हेच आता तुमच्या मतावर ऑनलाईन नियंत्रण ठेवणार आहेत," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

अमेरिकेचे पत्रकार क्ले ट्रेव्हिस यांनी "हे आहेत ट्विटरचे नवे सीईओ. जॅक डॉर्सी गेल्यानंतर याठिकाणची परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे," असं ट्वीट केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

"ज्या संदर्भानं हे वक्तव्य केलं आहे, ते मुद्द्यापेक्षा वेगळं आणि डेली शोमधून आलेलं आहे. सर्व मुस्लीम कट्टरतावादी नसतात आणि सर्वच श्वेतवर्णीय वर्णभेदी नसतात, असं पराग यांचं मत असल्याचं यावरून स्पष्ट होतं," असं ट्वीट सिराज हाश्मी नावाच्या ट्विटर युझरनं केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

सोशल मीडियावर भारतीय देताहेत शुभेच्छा

पराग अगरवाल हे ट्विटरचे नवे सीईओ असतील हे जाहीर केल्यानंतर भारतात पराग अगरवाल आणि ट्विटर सीईओ टॉप ट्रेंडमध्ये होतं. त्यांची सीईओपदी नियुक्ती झाल्यानं, भारतीय युजर्स त्यांचं अभिनंदन करत आहेत.

अनेक भारतीय असे ग्राफ शेअर करत आहेत, ज्यात गुगल, मायक्रोसॉफ्ट यांच्या भारतीय वंशाच्या सीईओंच्या यादीत आणखी एक भारतीय नाव जोडल्याचं दिसत आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

तर काही यूजर्सनं पराग अगरवाल यांना टॅग करत काही मागण्याही केल्या आहेत.

"पराग अगरवाल यांनी जॅक यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं आणि कंगनाचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू केलं, तरच ते खरे भारतीय समजले जातील. पराग यांना शुभेच्छा. भारत जगावर राज्य करत आहे," असं ट्वीट राजशेखर झा नावाच्या ट्विटर यूजरनं केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

ट्विटरचे नवे सीईओ जाहीर झाल्यानंतर पराग अगरवाल यांनी माजी सीईओ जॅक डॉर्सी आणि इतर सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

''धन्यवाद जॅक. हा माझा गौरव करण्यासारखं आहे. तुमच्याकडून सातत्यानं मिळणारा सल्ला आणि मैत्रीसाठी मी आभारी आहे. आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठीही आपले आभार. संपूर्ण टीमनं आमच्या भवितव्यावर विश्वास दाखवण्याची प्रेरणा दिली, याबाबतही मी आभारी आहे,'' असंही त्यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या पत्रात लिहिलं.

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 7

''मी या कंपनीबरोबर 10 वर्षांपूर्वी जोडला गेलो होतो. त्यावेळी या कंपनीत एक हजारपेक्षा कमी कर्मचारी होते. ही दहा वर्षांपूर्वीची गोष्ट असली तरी मला कालच घडल्यासारखं वाटतत आहे. मी या दरम्यान अनेक चढ-उतचार, आव्हानं, यश-अपयश पाहिले. पण तेव्हा आणि आताही ट्विटरचा प्रचंड प्रभाव आणि त्याची प्रगती मला दिसत आहे,'' असंही त्यांनी म्हटलं.

X पोस्टवरून पुढे जा, 8
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 8

''आम्ही आमचे ध्येय गाठण्यासाठी नुकतंच नवीन धोरणं अवलंबलं आहे. पण चांगले परिणाम मिळण्यासाठी आणि ग्राहकांसह समभागधारक आणि तुम्हा सर्वांसाठी अधिक चांगलं बनवण्यासाठी ते लागू कसं करायचं हे आव्हान आमच्यासमोर आहे,'' असं पराग अगरवाल यांनी लिहिलं.

''सध्या जग आपल्याकडे पाहत आहे, पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात. अनेक लोकांचे विविध विचार आणि दृष्टीकोन असतील. कारण ट्विटर आणि आमच्या भवितव्याचा ते विचार करतात. त्यावरून आम्ही करत असलेल्या कामाला महत्वं आहे, हे स्पष्ट होतं. चला, जगाला ट्विटरची संपूर्ण क्षमता दाखवू, असं त्यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)