इम्रान खान: भारतीय गहू पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पाठवायला परवानगी

भारतीय गहू पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पाठवण्याच्या तालिबानच्या मागणीबाबत आपण सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करू, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
अफगाणिस्तानवर सध्या तालिबान सरकारचं नियंत्रण आहे. गेली कित्येक वर्षे युद्धात फरपटत असलेल्या अफगाणिस्तानातील परिस्थिती सध्या खूप बिकट आहे.
देशात गंभीर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं.
पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तानचे कार्यकारी परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्तकी यांच्या नेतृत्वाखालील एका प्रतिनिधीमंडळासोबत चर्चा केली. त्यादरम्यान झालेल्या संवादादरम्यान त्यांनी वरील विचार मांडले आहेत.
मुत्तकी हे आपल्या तीनदिवसीय पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. अर्थ, उद्योग खात्यांची जबाबदारी असलेले मुत्तकी यांच्यासोबत त्यांचे इतर सहकारीही या दौऱ्यावर आलेले आहेत.
पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत या प्रतिनिधीमंडळाची बैठक झाली. यामध्ये अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली.
अफगाणिस्तानसमोर येऊ शकणाऱ्या संभाव्य सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी पाकिस्तानकडून शक्य तितकं सहकार्य केलं जाईल, असं इम्रान खान म्हणाले.
या चर्चेदरम्यान खान यांचा जोर अफगाणिस्तानातील शांतता आणि स्थैर्य या विषयांकडे सर्वाधिक होता.

फोटो स्रोत, Getty Images
अंतरिम अफगाण सरकारकडून आंतरराष्ट्रीय समुदायाची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न कायम सुरू असतील, अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली.
देशातील आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी बँकेचे व्यवहार तत्काळ सुरू केले जावेत, असा सल्ला त्यांनी दिला.
थंडीच्या दिवसात आवश्यक ती सर्व मदत पाकिस्तानकडून केली जाईल.
पाकिस्तानकडून आधीपासून देण्यात येणाऱ्या मदतीशिवाय गहू, तांदूळ, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि इतर आवश्यक खाद्यपदार्थांचा पुरवठा अफगाणिस्तानला करण्यात येईल.
अफगाणिस्तानची प्रगती आणि समृद्धी वेगाने होण्याकरिता एकत्रितरित्या वाहतूक, संपर्क तसंच इतर सुविधांबाबत काम करण्याला प्राधान्य असेल, असंही इमरान खान म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








