कोरोना : भारतात होणाऱ्या कोरोना चाचण्या विश्वासार्ह नाहीत - ऑस्ट्रेलियन प्रीमियर

मार्क मॅकगोवन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मार्क मॅकगोवन

भारतातून ऑस्ट्रेलियात परतणाऱ्या प्रवाशांची भारतात होणारी कोरोना चाचणी विश्वासार्ह किंवा अचूक नसल्याचं वक्तव्य वेस्ट ऑस्ट्रेलिया स्टेट प्रीमियर मार्क मॅकगोवन यांनी केलंय. याचा परिणाम ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थेवर होत असून नव्या समस्या निर्माण होत असल्याचंही ते म्हणाले.

पश्चिम ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांना भारतातून परतलेल्या चार प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं आढळलं आहे. या चौघांना पर्थमधील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

एका स्थानिक टेलिव्हिजन चॅनेलशी बोलताना मार्क मॅकगोवन म्हणाले, "आज (27 एप्रिल) सकाळी झालेल्या आमच्या टीमच्या तातडीच्या बैठकीत मला सांगण्यात आलं की, विमानातून ऑस्ट्रेलियात आलेल्या 79 प्रवाशांपैकी 78 प्रवासी भारतातहून आले आहेत. आमचा अंदाज आहे की या प्रवशांमध्ये अनेक जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते."

ते म्हणाले, "भारतात केल्या जाणाऱ्या काही चाचण्या एकतर योग्य नाहीत किंवा त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. यावरून अडचणी निर्माण होत आहेत हे स्पष्ट आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

कोरोनाची लागण झालेले अनेक जण ऑस्ट्रेलियात प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणच्या व्यवस्थेत त्रुटी असल्याचे संकेत देत आहेत असंही ते म्हणाले.

ते पुढे सांगतात, "ऑस्ट्रेलियात प्रवास करणाऱ्या या प्रवाशांच्या कोरोना चाचणीचे निकाल एकतर चुकीचे असू शकतात किंवा प्रवासी चुकीचा रिपोर्ट दाखवून प्रवास करत आहेत. दोन्ही कारणांमुळे व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होते. म्हणून आम्हाला इथे अनेक समस्या उद्भवत आहेत."

अत्यंत महत्त्वाचे असेल तरच भारतात प्रवास करा अन्यथा करू नये, असं आवाहन मॅकगोवन यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांना केलं आहे.

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका विवाह समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पर्थमध्ये आढळलेल्या रुग्णाने नुकताच भारताचा दौरा केला होता.

भारतासाठी ऑस्ट्रेलिया मदत पाठवणार

कोरोनामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक असल्याची भावना ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री कॅरेन अँड्र्यूज यांनी मंगळवारी (27 एप्रिल) व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, "भारतात दररोज शेकडो नवीन रुग्णांची नोंद होत आहे. अनेक लोकांचा मृत्यू होतोय. परिस्थिती अत्यंत वाईट आहे."

भारतीय विमानतळ (प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Twitter AAI

फोटो कॅप्शन, भारतीय विमानतळ (प्रातिनिधिक फोटो)

भारताला आपत्कालीन मदत पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या.

"सध्या भारतात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर पोहचवण्याच्यादृष्टीने चर्चा सुरू आहे. आम्हीही याचा विचार करत आहोत. आम्ही आणखी काय करू शकतो याचाही विचार सुरू आहे. त्या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांनाही सुरक्षित परत आणण्याचाही प्रयत्न सुरू आहे." असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, भारत-ऑस्ट्रेलिया विमानसेवा तीन आठवड्यांनी रद्द केलीय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी (27 एप्रिल) याबाबत माहिती दिली. 15 मे रोजी पुन्हा या निर्णयावर विचार होईल आणि पुढेली दिशा ठरवली जाईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)