अमेरिका निवडणूकः जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, डोनाल्ड ट्रंप पराभूत

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण? याचा निर्णय स्पष्ट झाला असून, जो बायडन नवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत.
अनेक दिवस सुरू असलेल्या मतमोजणीनंतर जो बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना नमवत बाजी मारली आहे.
मतमोजणी सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी अध्यक्ष कोण हे स्पष्ट होत नव्हतं. दोन्ही उमेदवारांनी विजयी असल्याचे दावे केले होते. मात्र अखेर बायडन यांची या लढाईत सरशी झाली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"अमेरिका, या महान देशाचं नेतृत्व करण्यासाठी तुम्ही माझी निवड केली आहे. हा माझा सन्मान आहे. आपल्या सगळ्यांपुढचं आव्हान खडतर आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असणार आहे, तुम्ही मला मत दिलं असो किंवा नाही. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा माझा प्रयत्न असेल", असं जो बायडन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
कोरोनाची जागतिक साथ आणि समाजात असणारी अस्वस्थता यासगळ्यात अनेक महिने चाललेली प्रचार प्रक्रिया आणि चार दिवसांच्या क्लिष्ट मतमोजणी प्रक्रियेनंतर जो बायडन हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष असण्याचा अनुमान आहे.
राष्ट्राध्यक्ष होण्यासाठीच्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये जो बायडन जिंकतील असं बीबीसीची आकडेवारी सांगते.

फोटो स्रोत, Getty Images
व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून जाणं हे जो बायडन यांचं गेल्या 50 वर्षांपासूनचं स्वप्न आहे.
बायडन यांना 273 इलेक्टोरल व्होट्स मिळतील असं अनुमान आहे तर ट्रंप यांना 214 इलेक्ट्रोरल मतं मिळण्याचा अनुमान आहे. बायडन आणि ट्रंप यांच्यामधल्या इलेक्टोरल मतांमध्ये फार मोठा फरक नसला, तर देशभरातल्या पॉप्युलर व्होट्सच्या आकडेवारीत जो बायडन यांना ट्रंप यांच्यापेक्षा 40 लाख मतं जास्त आहेत.

बायडन हे व्हाईट हाऊसमध्ये नियुक्ती होणारे सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांच्यासोबत उपराष्ट्राध्यक्ष होणारा कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिला महिला उपाध्यक्ष असतील. यासोबतच त्या पहिल्या आशियाई वंशाच्या उपराष्ट्राध्यक्षही असतील.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
पेनसिल्व्हेनिया राज्यातली मतं बायडन यांच्यासाठी निर्णायक ठरली. पेनसिल्व्हेनियात बायडन यांना 20 इलेक्टोरॉल कॉलेज मतं मिळाली. यामुळं बायडन यांच्या मतांची संख्या 273 झाली.
बहुमतासाठी 270चा आकडा पार करणं आवश्यक असतं. हा आकडा पार केल्याने बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांची निवड केली आहे.
कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत सध्याचे उपाराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांना आव्हान दिलं होतं.
या पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला असणार आहेत, इतकंच नाही तर त्या मूळ भारतीयही आहेत. त्या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत.
यापूर्वी दोन वेळा महिलेला उपराष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली होती. 2008 साली रिपब्लिकन पक्षाने सारा पॅलिन यांना उमेदवारी दिली होती. तर 1984 साली डेमोक्रेटिक पक्षाने गिरालाडिन फेरारो यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या दोन्ही महिलांचा निवडणुकीत पराभव झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतल्या दोन्ही प्रमुख पक्षांनी आजवर कृष्णवर्णीय महिलेला अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली नाही आणि आजवर कुठलीच महिला अमेरिकेची राष्ट्राध्यक्षही झालेली नाही.
जॉर्जिया, अॅरिझोना आणि नेवाडा या ठिकाणी बायडन आघाडीवर आहेत. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक मताधिक्यापेक्षा त्यांना जास्त मतं मिळतील अशी शक्यता आहे.
संपूर्ण देश आपल्या पाठीशी उभा असून आपण स्पष्ट बहुमताने विजयी होऊ, असा आशावाद जो बायडन यांनी डेलवेअरमधल्या विलमिंग्टनमध्ये केलेल्या भाषणात व्यक्त केला होता.
पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात पावलं उचलू, असं आश्वासन जो बायडन यांनी दिलं होतं.

फोटो स्रोत, Reuters
कोरोना संकटामुळे अनेक मतदारांनी पोस्टल बॅलट पद्धतीद्वारे मतदान केलं. यामुळे मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण व्हायला दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड होण्यासाठी उमेदवाराला पॉप्युलर व्होट जिंकण्याची आवश्यकता नसते. त्याऐवजी उमेदवाराने इलेक्टोरॉल कॉलेज पद्धतीद्वारे बहुमत मिळवणं आवश्यक असतं. इलेक्टोरॉल कॉलेज म्हणजे प्रत्येक राज्याला लोकसंख्येनिहाय ठराविक मतं म्हणजेच इलेक्टॉर्स मिळतात.
जर तुम्ही ते राज्य जिंकलंत तर राज्याची मतं तुमच्या मतपेटीत येतात. (हा नियम नेब्रास्का आणि मेइन राज्यांना लागू नाही) अमेरिकेत एकूण 538 अशी राज्यांची मतं आहेत. जो उमेदवार 270 किंवा त्यापेक्षा जास्त मतं मिळवतो तो राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








