कोरोना व्हायरस : संसर्ग झाला की नाही, वास घेण्याच्या क्षमतेवरुन ओळखा

फोटो स्रोत, Getty Images
चव किंवा वास न कळणे हे कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं लक्षण आहे, हे आता आपल्याला माहीत आहे.
साधारणपणे, इतर सर्दी किंवा फ्लूमध्येही आपल्याला चव आणि गंध कळत नाही.
पण युरोपमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात एक विचित्र माहिती समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशी शंका आल्यावर रुग्ण ही एक चाचणी घरात करू शकतात. अर्थात त्यानंतर स्वॅब टेस्ट करावीच लागणार आहे. पण या चाचणीमुळे स्वॅब टेस्टआधी अलगीकरणात जाण्याचा निर्णय घेण्यास मदत होते.
कोरोनाची लागण झाल्यावरचं गंध न कळण्याचं लक्षणं आणि इतर सर्दी किंवा फ्लू झाल्यावरचं लक्षण यामध्ये फरक असल्याचं आढळून आलं आहे.
कोव्हिड-19 झाल्यानंतर रुग्णांना लगेचच हे लक्षण दिसायला सुरुवात होते. पण यामध्ये नाक गळणं किंवा नाक बंद होणं असे प्रकार दिसत नाहीत. कोरोनाची लागण झालेले अनेक रुग्ण मोकळेपणाने श्वास घेऊ शकतात. शिवाय या रुग्णांच्या तोंडाची चव जाणं हेसुद्धा एक लक्षण कोरोना संसर्गाचं आहे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

नासिकाशास्त्र विषयातील तज्ज्ञांनी याबाबत अधिक माहिती दिली. कोरोनाची लागण झाल्यामुळे चव गमावलेला रुग्ण खरोखरच कडू किंवा गोड यांमधील फरक सांगू शकत नाही. चव आणि गंधाची भावना निघून गेल्याने असं होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरस हा चव आणि गंधाशी संबंधित मज्जातंतूच्या पेशींवर थेट परिणाम करतो.
कोरोना व्हायरसची खालील प्रकारची मुख्य लक्षणं असल्याचं सांगितलं जातं.
- ताप
- विचित्र, सातत्याने येणारा खोकला
- चव आणि गंध न कळणे
ही लक्षणं जाणवत असलेल्या रुग्णांनी स्वतःच अलगीकरणात जावं आणि स्वॅब टेस्टच्या माध्यमातून चाचणी करून घेण्याची सूचना प्रशासनाकडून दिली जाते.
अशी लक्षणं जाणवणाऱ्या लोकांचे कुटुंबीय आणि संपर्कात आलेल्या मंडळींनीही अलगीकरणात जावं, असी सूचना आहे.
गंध चाचणी
युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँगिलाचे संशोधक प्रा. कार्ल फिलपॉट यांनी एक चव आणि गंध चाचणी 30 स्वयंसेवकांवर चव आणि गंध चाचणीचा प्रयोग केला.
यामध्ये 10 जण कोव्हिड पॉझिटिव्ह होते. 10 जणांना तीव्र सर्दी झाली होती तसंच इतर 10 जणांमध्ये कोणत्याच प्रकारच्या फ्लूचं लक्षण नव्हतं. ते निरोगी होते.

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हिड-19 रुग्णांमध्ये गंध न कळण्याचं लक्षण प्रामुख्याने आढळून आलं. त्यांना वास कळत नव्हता. कडू आणि गोड या चवीतला फरकसुद्धा त्यांना कळत नव्हता.
प्रा. फिलपॉट हे गंध आणि चवीशी संबंधित विकार असलेल्या लोकांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या फिफ्थ सेन्स या संस्थेतही काम करतात.
ते सांगतात, "श्वसनाशी संबंधित आजार पसरवणाऱ्या इतर विषाणूंपेक्षा कोरोना व्हायरसची लक्षणं खरोखरच वेगळी आहेत.
हे आश्चर्यकारक आहे. याचा अर्थ कोव्हिडग्रस्त आणि इतर सर्दी खोकल्यांच्या रुग्णांमधील फरक कळण्यासाठी गंध आणि चव चाचणीचा उपयोग करता येऊ शकतो.
लोक कॉफी, लसूण, संत्री किंवा लिंबू आणि साखर यांसारख्या उत्पादनांचा वापर करून स्वतःच गंध आणि चवीची चाचणी करू शकतात.
पण याचा अर्थ स्वॅब टेस्ट करण्याचं टाळावं, असं नाही. कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याबाबत स्पष्टपणे स्वॅब टेस्टमुळेच कळू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरसमुळे आजारी पडून बरे झालेल्या रुग्णांनी चव आणि वास घेण्याची शक्ती काही आठवड्यांनी पुन्हा परत येते, असंही प्रा. फिलपॉट यांनी सांगितलं.
प्रा. अँड्यू लेन जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमध्ये नाक आणि घसातज्ज्ञ आहेत.
पण कोरोना व्हायरसचा गंध व चव चाचणीवर कशामुळे परिणाम होतो याचा अभ्यास प्रा. लेन आणि त्यांची टीम करत आहे.
त्यांनी आपल्या संशोधनातील काही भाग युरोपियन रेस्पिरेटरी जर्नलमध्येसुद्धा प्रसिद्ध केला आहे.
वास ओळखण्यासाठी उच्च पातळीचे एन्झाईम नाकाच्या भागात कार्यरत असतात. या एन्झाईमना ACE-2 म्हणूनही संबोधतात.
सजीवांच्या शरीरातील एंट्री पॉईंट म्हणूनही हे एन्झाईम ओळखले जातात. यांच्या मदतीने कोरोना व्हायरस शरीरात प्रवेश करू शकतो. त्यानंतर आपल्याला संसर्ग होतो.
प्रोफेसर लेन म्हणतात, "शरीरात प्रवेश करण्यासाठी आणि संसर्ग करण्यासाठी विषाणू खरोखर या पेशींचा वापर करत आहे किंवा नाही, याबाबतची माहिती मिळवण्यासाठी अनेक प्रयोग करत आहोत."
"यासंदर्भात योग्य माहिती उपलब्ध झाल्यास नाकातून दिल्या जाऊ शकणाऱ्या अँटीव्हायरल थेरपीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. नाकावाटे होणारा संसर्ग रोखण्यास आपल्याला मदत होऊ शकते," असं लेन म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








