कोरोना व्हायरसः इटलीसह 'या' चार देशात पुन्हा वाढतायेत कोरोनाचे रुग्ण

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फ्रन्स, स्पेन, जर्मनी आणि इटली या चार देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

फ्रान्समध्ये गुरुवारी (20 ऑगस्ट) कोरोनाचे 4,771 नवे रुग्ण आढळले. आदल्या दिवशीच्या म्हणजे बुधवारच्या तुलनेत हा आकडा थेट एक हजाराने वाढलाय.

फ्रान्ससह स्पेन, जर्मनी आणि इटलीतही कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वेगानं वाढू लागलीय.

स्पेनमध्ये आता तरुणांमध्ये झपाट्यानं कोरोनाचा प्रसार होताना दिसतोय, तर जर्मनीत परदेशातून आलेल्या लोकांमध्ये लागण झालेली दिसून येतेय. स्पेनमध्ये गुरुवारी (20 ऑगस्ट) 3,349 नवे रुग्ण आढळले.

युरोपात कोरोनानं सर्वाधिक थैमान इटलीत घातला. गुरुवारी इटलीत 854 नवे रुग्ण आढळले. मे महिन्यानंतर पहिल्यांदाच इटलीत एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळले.

कोरोना

फोटो स्रोत, Reuters

फ्रान्समध्ये चाचण्या वाढवल्यानं रुग्णसंख्या वाढल्याचे म्हटले जात आहे. गेल्या आठवड्यात फ्रान्समध्ये 6 लाख 64 हजार चाचण्या केल्या गेल्या. मात्र, जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होताना दिसतेय, हे चिंतेचं कारण समजलं जातंय. फ्रान्समधील सर्व मोठ्या शहरात मास्क बंधनकारक करण्यात आलंय.

लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यानं संसर्ग वाढल्याची चर्चा आहे.

इटली कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान, इटलीतील मिलान आणि ट्युरीन या दोन शहरांमध्ये डिसेंबरपासूनच कोरोनाचे विषाणू अस्तित्वात होते, असं समोर आलं होतं. इटलीतल्या शास्त्रज्ञांनी या दोन्ही शहरांमधील सांडपाण्याचा अभ्यास केला, त्यात ही गोष्ट उघडकीस आली होती.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

इटलीतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार, मिलान आणि ट्युरीन या दोन शहरांमधील सांडपाण्यात 18 डिसेंबरलाच कोरोनाचे विषाणू दिसून आले होते.इटलीतील कोरोनाचा पहिला अधिकृत रुग्ण फेब्रुवारीच्या मध्यात सापडला होता.विशेष म्हणजे, चीनमधील अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरसच्या विषाणूंबाबत डिसेंबरच्या अखेरीस दुजोरा दिला होता. याआधी फ्रान्समधील शास्त्रज्ञांनीही मे महिन्यात दावा केला होता की, 27 डिसेंबरलाच कोरोनाचा पहिला रुग्ण फ्रान्समध्ये आढळला होता. मात्र, त्यावेळी रुग्णाला न्युमोनिया झाल्याचा संशय होता. मात्र, नंतर लक्षात आलं की, त्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला होता.स्पेनमध्ये जानेवारीच्या मध्यात बार्सिलोनामध्ये पाण्यातच कोरोनाचा विषाणू सापडला होता. मात्र, या घटनेच्या जवळपास 40 दिवसांनंतर स्पेननं कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याला दुजोरा दिला होता.

कोरोना
लाईन

इटलीच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं ऑक्टोबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीतल्या उत्तर इटलीतील सांडपाण्याच्या 50 नमुन्यांचा अभ्यास केला. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील सांडपाण्याच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. यात कुठलाही कोरोनासदृश विषाणू आढळला नाही, असं इटलीतल्या जलतज्ज्ञ ग्युसेप्पिना ला रोसा यांनी सांगितलं. इटलीतल्या बोलोग्नातील सांडपाण्यात जानेवारीपासून विषाणू आढळले.

या सर्व अभ्यासामुळे इटलीत कोरोनाचा विषाणू नेमका कसा पसरत गेला, हे शोधण्यात यश मिळू शकेल, अशी आशा ला रोसा यांना वाटतेय.

इटलीत बाहेरून न आलेला पहिला रुग्ण लोम्बार्दिया प्रांतातील कोडोग्नो शहरात सापडला होता. हा भाग 21 फेब्रुवारीलाच 'रेड झोन' घोषित करण्यात आला. त्यानंतर या भागाला लागून असलेली नऊ शहरं सुद्धा बंद करण्यात आली. मार्च महिन्यात तर संपूर्ण इटलीच लॉकडाऊन करण्यात आली.

इटलीच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचं अस्तित्व सांडपाण्याच्या माध्यमातून कळण्याला रणनितीच्या दृष्टीनं महत्त्व आहे. वैद्यकीय मार्गानं दुजोरा मिळण्याच्या आधीच विषाणू अस्तित्वात होता, हे यातून स्पष्ट होतं. आता अनेक देश ही क्लृप्ती वापरत आहेत.

जुलैमध्ये इटलीतल्या पर्यटन रिसॉर्टच्या सांडपाण्याचं निरीक्षण करण्यासाठी पायल प्रोजेक्ट सुरू केले जाणार आहेत. त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशभर असा प्रयोग केला जाईल.

इटलीत कोरोनानं सुमारे 35 हजार नागरिकांचा बळी घेतला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)