कोरोना व्हायरस: WHO तैवान आणि चीन यांच्यातल्या वादाला बळी पडतंय का?

तैवान, कोरोना

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, तैवानचं नाव जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीतून वगळण्यात आलं आहे.

तैवान जगभरातल्या अशा काही मोजक्या देशांपैकी एक आहे जिथे कठोर उपायांची अंमलबजावणी न करताच कोरोना व्हायरस पसरण्यापासून यशस्वीरीत्या रोखला गेला.

मात्र एवढी मेहनत करूनही तैवानला चीनसोबत असलेल्या तणावपूर्ण संबंधांमुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सदस्यत्वापासून दूर ठेवण्यात आलंय.

WHOच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तैवानबाबत विचारलेला प्रश्न दुर्लक्षित केला आणि ही बाब समोर आली. ही मुलाखत व्हायरल झाल्यामुळे आता WHOवर टीका होते आहे.

नेमकं काय झालं ?

गेल्या शनिवारी हाँगकाँगच्या RTHK या चॅनेलवर WHOचे साहाय्यक महासंचालक ब्रुस एलवर्ड यांची पत्रकार यॉन टाँग यांनी व्हीडिओ कॉलवर घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली.

तैवानला WHOचं सदस्यत्व देण्याबाबत पुनर्विचार करणार का, असा प्रश्न टाँग यांनी अधिकाऱ्याला विचारला. मात्र त्याचं उत्तर देताना त्यांनी काही वेळानंतर आपल्याला आवाज ऐकू येत नसल्याचं सांगितलं. शिवाय, पत्रकाराला पुढचा प्रश्न विचारण्यास सांगितला.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

पण टाँग यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारत आपल्याला तैवानविषयी बोलायचंय, असं स्पष्ट केलं. तैवानबाबत पुन्हा प्रश्न विचारल्याने एलवर्ड यांनी फोन कट केला. त्यांना पुन्हा एकदा फोनवरून संपर्क करण्यात आला. यावेळी एलवर्ड यांना फोनवरच तैवानने कोरोना व्हायरसच्या संसर्गाला आटोक्यात आणल्याविषयी प्रश्न विचारला.

एलवर्ड यांनी उत्तर देताना सांगितलं, "आपण यापूर्वीच चीनविषयी बोललो आहोत." त्यांच्या या प्रतिक्रियेतल्या शेवटच्या वाक्यात चीनची भूमिका प्रतिबिंबित झाली.

चीन-तैवान यांच्यातला वाद नेमका आहे काय?

तैवानच्या स्वातंत्र्याचा मुद्दा अतिशय संवेदशनशील आहे.

तैवानमध्ये 1950पासून स्वयंशासित, प्रत्यक्षात कार्यरत असलेली लोकशाही आहे. 1950 साली चीनच्या राष्ट्रवादी सरकारचा कम्युनिस्टांनी पराभव केल्यानंतर राष्ट्रवाद्यांनी तैवानमध्ये आश्रय घेतला.

तैवान

फोटो स्रोत, Getty Images/ SAM YEH

फोटो कॅप्शन, तैवानचे दिवंगत नेते चिआंग काइ शेक यांच्यासह प्रमुख नेत्यांचे पुतळे असलेल्या पार्कातील दृश्य

चीनच्या मते तैवान या चीनचा एक प्रांत आहे आणि स्वतंत्र देश नाही. आणि जर वेळ आली तर लष्करी बळाचा वापर करून आम्ही त्याचं मुख्य भूमीच्या चीनबरोबर विलीनीकरण करू, अशीही चीनची भूमिका आहे.

त्यामुळे त्यांचा आग्रह आहे की इतर देशांनी एक तर चीनची राजनयिक संबंध ठेवावेत किंवा तैवानशी. पण दोन्ही देशांशी एकाच वेळी संबंध ठेऊ नयेत.

गेल्या काही वर्षांत चीन आपल्या दाव्याबद्दल अधिकच आग्रही झाला आहे. हा चीनच्या सार्वभौमत्त्वाशी संबंधित विषय आहे, अशी चीनची भूमिका आहे.

तैवानचे WHO सोबत संबंध कसे आहेत ?

तैवानकडे WHOचे सदस्यत्व नाही. अधिकाऱ्याने मुलाखतीत दिलेल्या वक्तव्यावरून तैवान आणि WHO मधील संबंध फारसे चांगले नसल्याचंच स्पष्ट झालंय.

WHOचे सदस्यत्व केवळ त्याच देशांना मिळतं जे युनायटेड नेशन्सचे सदस्य आहेत, किंवा ज्या देशांचे अर्ज जागतिक आरोग्य संघटना मंजूर करते.

याचाच अर्थ कोरोना व्हायरस या जागतिक आरोग्य संकटाविषयी ज्या काही महत्त्वाच्या बैठका आणि जागतिक तज्ज्ञांचे चर्चासत्र पार पडते यामध्ये तैवानला सहभागी करून घेतलं जात नाही.

तैवान, कोरोना

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, तैवानमध्ये सबवेमध्येही प्रवाशांची नियमित तपासणी केली जाते.

जागतिक आरोग्य परिषेदच्या वार्षिक बैठकांना उपस्थित राहण्याची परवानगी आयर्लंड देत नसल्याचं तैवानच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

चीन आणि तैवानच्या बिघडलेल्या संबंधांमागे काय कारण आहे? पाश्चिमात्य देश आशियाकडून कोरोना व्हायरच्या लढ्याबाबत काय शिकू शकतात? ही देश चेहऱ्यावर मास्क वापरत आहेत पण काही देश वापरत नाहीत. असे का?

WHO तैवानमधील कोरनाच्या रुग्णांची संख्या चीनच्या एकूण संख्येत समाविष्ट करते. यामुळे आरोग्य संकटाबाबत जगातली माहिती अचूक आणि वेळेवर मिळत नसल्याचं काओंचं म्हणणंय.

कोरोना
लाईन

WHO चीनचे कायम कौतुक करत असल्याची टीका काही तज्ज्ञांकडून केली जात आहे. WHO साठी चीनकडून सर्वाधिक योगदान दिलं जातं. त्यामुळे WHO चीनच्या बाजूनं झुकलेल्याचा आरोपही केला जातोय.

तैवानची कोंडी करण्याचा प्रयत्न केवळ WHO नाही तर यापूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेनं तैवानला डावलल्याची उदाहरणं आहेत.

बीबीसी तैपीचे सिंडी सुई सांगतात, या सर्व संघटनांपैकी WHO ही तैवानसाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण त्यांच्यानुसार जगातली सगळ्यात उत्तम आरोग्य सेवा देणारी यंत्रणा तैवानकडे आहे.

पूर्वी तैवान आणि बिजिंगमध्ये चांगले संबंध होते. जागतिक आरोग्य परिषदेत बीजिंग निरीक्षक होता. पण गेल्या काही वर्षात बीजिंग आणि तैपीचे संबंध बिघडले आणि तैवानने जागतिक आरोग्य परिषदेतलं आपलं स्थान गमावलं.

तैवानला वगळण्यात अडचण काय आहे?

जागतिक पातळीवर तैवानला वगळण्यात येते तेव्हा आपल्यासोबत दुजाभाव आणि अन्याय होत असल्याचा आरोप नेहमीच तैवाननं केलाय.

सध्याच्या परिस्थितीवरही तैवाननं आवाज उठवला आहे. जागतिक आरोग्य संकट असताना तैवानलाही जागतिक पातळीवर सहकार्याची गरज आहे. त्यामुळे अशापद्धतीने तैवानला दुर्लक्षित करणं चुकीचं असल्याचं मत तैवानकडून मांडण्यात आलं.

एका महिन्यापूर्वी चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरत होता तेव्हा तैवान सरकारने विचारणा करुनही WHO ने दुर्लक्षित केल्याचा आरोप तैवानने केलाय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

तैवान प्रवाशांची आरोग्य तपासणी करत आहे. "आरोग्य संकटाला राष्ट्रीय सीमा नसते ही बाब WHO ला समजेल अशी आम्हाला आशा आहे. या संकटात कुणासोबतही दुजाभाव केला जाऊ नये. कारण यामुळे संकट वाढू शकतं. कोणत्याही देशाला दुर्लक्षित केलं नाही तर तो देश जागतिक पातळीवर सहकार्य करू शकेल," असं तैवानचे आरोग्य मंत्री चेन शीह चंग यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत आपलं म्हणणं मांडलं.

कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्यापासून थांबवण्यासाठी आम्ही जे काही केलं ते सर्व आम्हाला जगासमोर मांडायचं असल्याचंही तैवाननं सांगितलं.

तैवाननं यशस्वीरित्या आरोग्य संकटाशी सामना केला. ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर रोखता आला.

कोरनाचं संकट रोखण्यासाठी योजलेल्या उपाययोजनांमुळे तैवानचं कौतुक होतंय. तैवाननं उचललेल्या पावलांमुळे कोरोनावरही नियंत्रण मिळवता आलं आणि बळींची संख्याही घटली.

तैवान

फोटो स्रोत, Getty Images/ Marc Gerritsen

फोटो कॅप्शन, तैपेईमधील एक दृश्य

चीनमधून येणारी हवाई वाहतूक वेळीच रोखली गेली. जे प्रवासी चीनमधून आलेत त्यांना क्वारंटाईन होणं सक्तीचे करण्यात आले. शिवाय, त्यांच्यावर बारकाईने नजर ठेवण्यात आली. त्यामुळे तज्ज्ञांनुसार कोरोना व्हायरस हा जनतेमध्ये पसरला नाही.

"कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या नागरिकांची टेस्ट करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले. संशयितांना शोधणे आणि नागरिकांमध्ये सोशल डिस्टसिंग ठेवण्यातही ते यशस्वी ठरले," हाँगकाँग विद्यापीठाचे साथीचे तज्ज्ञ प्राध्यापक बेंजामीन काऊलिंग सांगत होते.

तैवानच्या सदस्यत्वाबाबतच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी उत्तर देणं गरजेचं नसून सदस्य राष्ट्रच यावर काय ते बोलतील असं WHOनं एलवार्ड यांच्या मुलाखतीनंतर स्पष्ट केलं.

तैवानच्या आरोग्य तज्ज्ञांच्या आम्ही संपर्कात असून त्यांच्यासोबत काम सुरू आहे. जलद उपचाराची माहिती आम्ही त्यांच्याकडून घेत आहोत.

आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, तैवान WHO सोबत काही प्रमाणात काम करत असून त्यांना योग्य माध्यमातून माहिती दिली जात आहे. पण WHO चा सदस्य ज्यापद्धतीने काम करतो किंवा त्या दर्जाचे काम करतो तसं होत नाहीय.

तैवान

फोटो स्रोत, EPA

सोमवारी राष्ट्रपती त्सई इंग वेन यांनी WHO च्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देत सांगितलं, " आम्हाला आशा आहे की आतातरी जागतिक स्तरावर तैवानची क्षमता समजली असेल. या जागतिक आरोग्य संकटात तैवानच्या योगदानाला गांभीर्यानं घेतलं जाईल"

"तैवानची भूमिका कायम स्पष्ट राहिली आहे: त्यांच्याकडे आरोग्य सुरक्षेची क्षमता असून इतर देशांसोबत त्यासाठी काम करण्याचाही तयारी आहे. आपले अनुभव इतरांना सांगण्यांचीही तयारी आहे"

तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांनी मात्र एलवर्ड यांच्या मुलाखतीबाबत तीव्र प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, "WHO तैवानचे नावही बोलू शकत नाही."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

चीनकडून मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण वीबो या समाज माध्यमवर अनेकांनी एलवर्ड यांच्या प्रतिक्रीयेचे कौतुक केले आहे.

चीन आणि तैवान दोन्ही देश कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही देशांमध्ये आशियातल्या इतर देशांप्रमाणे परदेशातून आलेल्या आपल्या नागरिकांपासून संसर्ग पसरत आहे.

सोमवारपर्यंत, 24 लाख लोकसंख्या असलेल्या तैवानमध्ये 300 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 5 रूग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

आशियातील इतर देशांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात आणण्यात येत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या तुलनेनं छोट्या असलेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग सुरू असूनही संसर्ग बळावण्याचं प्रमाण अधिक आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)