फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅपवरचे मेसेजेस आता एकाच अॅपवर येणार?

फेसबुकने इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजर या तीन अॅप्लिकेशन एकमेकांना जोडणार आहे. त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व कायम राहात या तीनही अॅपवर आपापसांत मेसेज पाठवता येणार आहेत.
सध्या हे तीनही अॅप स्वतंत्र आहेत. यात सुधारणा करून या अॅपचे कोअर एकमेकांशी जोडले जातील, जेणे करून युजर या तीनही अॅपवरून एकमेकांना मेजेस पाठवू शकतात.
ही एक दीर्घ प्रक्रिया आहे, अशी माहिती फेसबुकने बीबीसीला दिली.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तात ही प्रक्रिया 2019च्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मार्क झुकरबर्ग यांनी तीनही अॅपच एकत्रीकरण करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे या तीनही अॅप्सच्या सेवा अधिक उपयुक्त होतील आणि लोक त्यांचा अधिकाधिक वेळ वापर करतील, असं त्यांना वाटतं.
The Verge या वेबसाईटवर मॅकन केली म्हणतात, "गुगल आणि अॅपलची आयमेसेज सेवा यांना अधिक सक्षमपणे तोंड देण्यासाठी फेसबुकला या तीनही अॅप्सना एकत्र करणे फायद्याचं ठरू शकतं."
फेसबुकने म्हटलं आहे, "मेसेज पाठवण्याचा अनुभव अधिक चांगला, सुरक्षित, सोपा आणि विश्वासार्ह व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे."

फोटो स्रोत, Reuters
मेसेज पाठवणाऱ्या आमच्या सेवा End to End Encrypted असाव्यात आणि इतर अॅपवरील मित्र आणि कुटुंबीय यांच्याशी संवाद साधणं सोपं व्हाव, यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. ही एकत्रित व्यवस्था कशी काम करेल, यावर सध्या चर्चा सुरू आहेत.
सध्या इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅप स्वतंत्र कंपनीसारखं काम करतात, त्यामुळे फेसबुकचे नवी प्रयत्न महत्त्वाचे आहेत. मार्क झुकरबर्ग यासाठी आग्रही आहेत. यातूनच इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या संस्थापकांनी ही कंपनी गेल्या वर्षी सोडली, असं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं आहे.
फेसबुक युजरची माहिती कशाप्रकारे हाताळतं आणि ती कशी सुरक्षित ठेवतो, यावर सध्या मतमतांतरे आहेत. त्यामुळे तीनही अॅप एकमेकांशी जोडल्यानंतर फेसबुक माहिती कशी हाताळतं या संदर्भात नियामक संस्थांना नव्याने लक्ष द्यावे लागणार आहे.
फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या दोन्हीत युजर्सच्या माहितीची देवाणघेवाण होते का याची चौकशी ब्रिटनच्या माहिती आयुक्तांनी यापूर्वीच केली आहे.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








