गांजाचा मनोरंजनासाठी वापर करण्यास कॅनडा संसदेची मंजुरी

गांजा

फोटो स्रोत, PRESS ASSOCIATION

कॅनडाच्या संसदेनं देशभरात मारिजुआनाच्या म्हणजेच गांजाच्या मनोरंजक वापराला मान्यता दिली आहे.

कॅनाबिस अॅक्ट हे विधेयक संसदेत चर्चेला आलं. मंगळवारी त्यावर मतदान होऊन 52-29 अशा मत फरकानं ते मंजूर करण्यात आलं. गांजाची लागवड, त्याचं वितरण आणि विक्री याचं नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे.

येत्या सप्टेंबरपासून कॅनडातल्या नागरिकांना गांजाची खरेदी आणि वापर करता येणार आहे.

असा निर्णय घेणारे G7 देशांतलं कॅनडा हे पहिलंच राष्ट्र आहे.

गांजा बाळगणं हा 1923 मध्ये कॅनडात गुन्हा ठरवण्यात आला. 2001मध्ये त्याच्या वैद्यकीय वापरास कायदेशीर मान्यता देण्यात आली.

संसदेनं मंजुरी दिलेल्या या विधेयकावर आठवडाभरात राजमान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकार कायद्याच्या अंमलबजावणीची अधिकृत तारीख जाहीर करेल.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ट्वीट करून या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

सरकारचा हा निर्णय सगळ्यांनाच मान्य नाही. विरोधी पक्ष आणि काही गटांनी या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवला असून चिंताही व्यक्त केली आहे.

दरम्यान, मारिजुआनाच्या विक्रीसाठी जागांची व्यवस्था करायला स्थानिक सरकारं आणि महानगरपालिकांना केंद्र सरकारकडून आठ ते 12 आठवड्यांची मुदत दिली जाण्याची शक्यता आहे.

कॅनडा

फोटो स्रोत, AFP/GETTY

कॅनडातल्या नागरिकांनी 2015मध्ये गांज्यावर 4.5 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केल्याचा अंदाज आहे. कॅनडात वाईनवर झालेल्या खर्चाएवढीच ही रक्कम आहे.

सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कॅनडात विविध ठिकाणी परवानाधारक उत्पादकांना भांग आणि गांजा यांची विक्री करता येईल. शिवाय, परवानाधारक उत्पादकांकडून ऑनलाइनही मागवता येईल.

प्रौढ व्यक्तीला 30 ग्रॅम एवढा गांजा सोबत बाळगता येणार आहे. सर्वसाधारणपणे किमान वय 18 ठेवण्यात आलं आहे, तर काही प्रांतात ते 19 वर्षं आहे.

हे कसं झालं?

जस्टिन ट्रुडो यांनी 2015च्या निवडणूक प्रचारात असा कायदा करण्याचं आश्वासन दिलं होतं. बहुसंख्य कॅनेडियन नागरिक गांजाचा वापर कायदेशीर करण्याच्या बाजूने होते.

गांजा बाळगणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्यासाठीच्या कायद्याचा वापर कॅनडात मोठ्या प्रमाणात होत होता, अशी भूमिका ट्रुडो यांनी वेळोवेळी मांडली होती.

डिसेंबर-2013मध्ये उरुग्वेनं सर्वप्रथम गांजाच्या वापराला कायदेशीर मान्यता दिली. अमेरिकेच्या काही प्रांतातही मनोरंजनासाठी गांजा वापरण्यास परवानगी आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)