श्रीलंका : हत्तीणीचं पिल्लू खड्ड्यात पडलं आणि...
श्रीलंकेमध्ये हँबॉनटोटाच्या जंगलात एका हत्तीणीचं पिल्लू रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडलं. वनाधिकाऱ्यांची एक टीम कशीबशी वाचवण्याचे प्रयत्न केले, पण हत्तीण काही पिलाजवळ जाऊच देईना.
तिला भीती होती की हे लोक आपल्या पिल्लाचा जीव वाचवायला नाही तर घेऊन जायला आले आहेत. तिने जोरदार प्रतिकार केला.
पण वनाधिकाऱ्यांनी बंदूकीतून धोकादायक नसलेल्या गोळ्या झाडून आधी हत्तीणीला तिला रोखलं.
आणि मग दोराने खेचून पिल्लाला बाहेर काढलं. मग ते पिलू कसं हत्तीणीला जाऊन बिलगलं ते बघण्यासारखंच...
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)