चीनमधल्या सर्वांत मोठ्या धर्माचं नाव तुम्ही ऐकलंसुद्धा नसेल

मुस्लीम धर्मीय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीन मधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष नास्तिकतेचं समर्थन करतो.

चीन हा देश अधिकृतरित्या नास्तिक देश आहे. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष देखील कोणत्याही धर्माचं पालन करत नाही आणि नास्तिकतेचचं समर्थन या पक्षाकडून केलं जातं.

अधिकृतरीत्या नास्तिक असून देखील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष इथल्या धर्मांना नष्ट करण्यात अपयशी ठरला आहे.

चीनमधील सरकारी माध्यमांनुसार, कम्युनिस्ट पक्षाच्या निवृत्त सदस्यांनाही कोणत्याही धर्माचं पालन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आपला देश नास्तिक असून प्रत्येक धर्म पाळणाऱ्या व्यक्तीला चीनमध्ये स्वातंत्र्य असल्याचा दावा नेहमी चीनकडून करण्यात येतो.

चीनमध्ये धार्मिक स्वातंत्र्य असलं तरी धार्मिक उपक्रम स्वतंत्रपणे राबवण्यात अनेकदा अडचणी येताना दिसतात.

धर्मावर नियंत्रण

चीनमध्ये प्रत्येक चर्चला कोणत्याही कार्यक्रमासाठी सरकारची मंजुरी घ्यावी लागते. तसंच चर्चच्या कारभारावर देखील सरकारी नियंत्रण असतं.

महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पारंपरिक बौद्ध आणि ताओइजम हे धर्म मानणारे जवळपास 30 ते 40 कोटी लोक चीनमध्ये राहतात.

चीनच्या शिंजियांग प्रांतातील मुस्लिमांना सुद्धा अनेक सरकारी निर्बंध सहन करावे लागत आहेत.

चीन हा 21 व्या शतकातल्या जगातील बलाढ्य देशांच्या यादीत येऊन उभा राहिला आहे. तसंच जगातील सर्वाधिक उत्पादन करणार देश म्हणून देखील चीनकडे पाहिलं जातं.

मात्र, चीन एवढा बलाढ्य असला तरी या देशातील धर्मांना मात्र लाचार होऊन आपलं अस्तित्व टिकवावं लागत आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे अंदाजे साडेआठ कोटी सदस्य आहेत.

या सगळ्या सदस्यांना कोणत्याही धर्माचं पालन करण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे.

जर कोणताही सदस्य धर्माचं पालन करताना आढळला तर त्याला कडक शिक्षा करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

धर्म येतो विचारसरणीच्या आड

धार्मिक आस्था डाव्या विचारसरणीला कमकुवत करते अशी चीनमधल्या सरकारची धारणा आहे. त्यामुळे पक्षाच्या सदस्यांना मार्क्सवादी नास्तिक बनण्यास सांगितलं जातं.

नमाज पढणारी व्यक्ती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनच्या शिंजियांग प्रांतातील मुस्लिमांना सुद्धा अनेक सरकारी निर्बंध सहन करावे लागत आहेत.

पक्षाच्या सदस्यांना या कडक नियमांचं पालन करावंच लागतं. चीनचे पहिले कम्युनिस्ट नेते माओ-त्से-तुंग यांनी धर्म संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी नास्तिकतावादाचा पुरस्कार केला होता.

तरी देखील चीनमधील धर्मांचा विचार केला तर तीन धर्मांचा उल्लेख प्रामुख्यानं केला जातो. ते म्हणजे कन्फ्युशियनिजम, बौद्ध आणि ताओइजम.

कम्युनिस्ट पक्षाच्या कठोर नियमांनंतरही हे धर्म देशात उभे राहिले आहेत.

इथं बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम आणि ताओइजम या धर्मांना मानणारे लोक सर्वाधिक आहेत. मात्र, या सगळ्या धर्मातील लोकांना सरकारी नियंत्रणातील चर्च, मंदिर आणि मशीदीतच प्रार्थना करता येते.

चर्चसमोर प्रार्थना करणारे नागरिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनमध्ये जवळपास 6.7 कोटी ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत.

गेल्या काही दशकात चीनमध्ये धर्मांना आपले हात-पाय पसरण्याची संधी मिळाली होती. या काळात चीनमध्ये मंदिर, मशीद आणि चर्चची निर्मिती झाली.

सध्याच्या दिवसांत ख्रिश्चन धर्म चीनमध्ये वेगाने वाढणारा धर्म म्हणून ओळखला जातो.

ख्रिश्चन धर्म वेगानं वाढणारा धर्म

चीनमध्ये जवळपास 6.7 कोटी ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत. या कोट्यावधी लोकांना एक अधिकृत चर्च वगळता इतर चर्चमध्ये प्रार्थना करणं अवघड काम आहे.

चीनमध्ये धर्मावर नियंत्रण ठेवण्यामागे एक व्यवसायिक कारण देखील आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी स्थानिक सरकार भाविकांना प्रवेश शूल्क भरण्याची सक्ती सुद्धा करतं.

पारंपरिक बौद्ध आणि ताओइजम हे धर्म मानणारे जवळपास 30 ते 40 कोटी लोक या देशात राहतात. बौद्ध या एकमेव परकीय धर्माला चीनमध्ये स्वीकारण्यात येतं असं मानलं जातं.

बौद्ध धर्म चीनच्या ग्रामीण भागात पोहचला असून दुसऱ्या शतकात हा धर्म चीनमध्ये आला होता.

इस्लाम धर्म चीनमध्ये सातव्या शतकात आला होता. अरब व्यापाऱ्यांमुळे या धर्माला चीनमध्ये प्रवेश मिळाला होता. सध्या मुस्लीम नागरिक चीनमध्ये अल्पसंख्याक आहेत.

सध्या या देशात दीड कोटी मुस्लीम नागरिक असल्याचं मानलं जातं.

राजकीयदृष्ट्या चीनमध्ये मुस्लिमांना विशेष महत्त्व आहे. कारण, चीनचे बहुतांश मुस्लीम देशांशी चांगले संबंध आहेत.

इथले मुस्लीम सुन्नी पंथाचे असले तरी त्यांच्यावर सुफी पंथाचा प्रभाव अधिक आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)