हज यात्रा : मक्केत घुसून गैर-मुस्लीम पत्रकाराने बनवला व्हीडिओ, मदत करणाऱ्यास अटक

फोटो स्रोत, CHANNEL 13 NEWS
सौदी अरेबियातील हज यात्रेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पवित्र मक्का शहरात गैर-मुस्लीम व्यक्तीने प्रवेश केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, मक्केत प्रवेश करणारा व्यक्ती हा एक इस्रायली पत्रकार होता.
मक्का हे मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र धार्मिक स्थान मानलं जातं. त्याठिकाणी गैर-मुस्लीम व्यक्तीच्या प्रवेशावर बंदी आहे. त्यामुळे इस्रायली पत्रकाराच्या मक्का प्रवेशामुळे केवळ सौदी अरेबियाच नव्हे तर जगभरात खळबळ माजल्याचं दिसून येत आहे.
या प्रकरणाच इस्रायलच्या पत्रकारास मक्का प्रवेशासाठी मदत करणारा संशयित व्यक्ती हा सौदी अरेबियाचाच नागरिक होता. या व्यक्तीस पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
इस्रायलच्या चॅनल 13 चे टीव्ही पत्रकार गिल तामरी यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला होता. या व्हीडिओत ते मक्का येथे गेल्याचं दिसून येतं.
गिल तामरी यांनी केवळ मक्का येथे प्रवेशच केला नाही, तर येथील पवित्र धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माऊंट अराफातची चढाईही केली. हज यात्रेच्या वेळी यात्रेकरू माऊंट अराफातवर एकत्र येत असतात.
गिल तामरी यांच्या या यात्रेसी सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी देण्यात आलेली नव्हती. पण तरीही त्यांनी तिथे प्रवेश केल्याचं समोर आलं. शिवाय तामरी यांनी इजरायलला परतल्यानंतर त्यांच्या चॅनल 13 या वृत्तवाहिनीने यासंदर्भात एक बातमीही प्रसिद्ध केली होती.
या यात्रेनंतर पत्रकार गिल तामरी यांनी माफी मागितली आहे. ते म्हणाले, "धार्मिक सहिष्णुता वाढवण्यासाठी मी मक्का आणि इस्लामचं सौंदर्य जगाला दाखवू इच्छित होतो."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
सौदी अरेबिया आणि इस्रायल या दोन देशांमध्ये कोणत्याही प्रकारचे राजनैतिक संबंध सध्या नाहीत. पण संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न होत आहेत.
गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सौदी अरेबिया दौरा केला होता. या दौऱ्यात अनेक इजरायली पत्रकारांनी विदेशी पासपोर्टचा वापर करून सौदी अरेबियात प्रवेश केला होता.
पत्रकार गिल तामरी यांना ते काय करत आहेत, त्याविषयी पूर्ण कल्पना होती. त्यांनी आपला व्हीडिओ बनवताना मक्केचं महत्त्व स्पष्टपणे सांगितलं. यावेळी ते असंही म्हणाले की "इथंपर्यंत पोहोचणारा, अशा प्रकारे व्हीडिओ चित्रीकरण करणारा मी पहिलाच इजरायली पत्रकार आहे."
सौदी प्रेस एजन्सीच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयिताने इजरायली पत्रकार गिल तामरी यांना रस्तेमार्गे मक्का येथे पोहोचण्यात मदत केली होती. हे येथील कायद्याचं स्पष्टपणे उल्लंघन आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
एजन्सीने इस्रायली पत्रकाराला अमेरिकन नागरिक म्हटलं आहे. मक्का पोलिसांच्या प्रवक्त्यांनी याविषयी बोलताना म्हटलं, "सौदी अरेबियात येणाऱ्या लोकांनी येथील कायद्यांचं पालन करावं. विशेषतः दोन पवित्र मशिदी आणि इतर पवित्र ठिकाणांच्या बाबतीत नियमांचं पालन हे झालंच पाहिजे. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल."
मक्का येथे प्रवेश करणाऱ्या पत्रकार गिल तामरी यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
व्हीडिओमध्ये काय आहे?
बीबीसी उर्दूने दिलेल्या माहितीनुसार, या व्हीडिओमध्ये गिल तामरी आपल्या कारमधून प्रवास करत असल्याचं दिसून येतं. त्यांच्यासोबत एक स्थानिक गाईडसुद्धा आहे. या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मास्क असल्याने त्याचा चेहरा स्पष्टपणे ओळखता येत नाही.
या व्हीडिओमध्ये म्हटलेलं आहे की सुरक्षा तपासणीनंतर सौदी अरेबियाच्या पोलीस कर्मचाऱ्याने आम्हाला मक्केला जाण्याची परवानगी दिली. रस्त्यात असलेला हा मोठा ब्लॉक टॉवरही तुम्ही पाहू शकता.

फोटो स्रोत, CHANNEL 13 NEWS
गिल तामरी या व्हीडिओमध्ये बोलताना म्हणतात, "सौदी अरेबियाच्या कायद्यानुसार याठिकाणी गैर-मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी आहे. मलाही इथं येणं अशक्य होतं. पण मला एक अतिशय चांगला माणूस भेटला. त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला मक्केत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
गिल व्हीडिओत पुढे म्हणतात, "पोलिसांनी मला जर अडवलं, तर मी माझ्या मित्रांना भेटायला जात आहे, असं मी त्यांना सांगेन."
मक्केकडे जाणाऱ्या या रस्त्यावर 'गैर-मुस्लिमांना प्रवेश बंदी' असा संदेश देणारे फलक ठिकठिकाणी पाहायला मिळतात. दरम्यान, रस्त्यावर पोलीस चेक-पोस्टवरून जात असताना गिल आपला कॅमेरा खाली घेऊन लपवतात.
माऊंट अराफातला पोहोचल्यानंतर गिल तामरी यांचा गाईड त्यांना म्हणतो, "हे बेकायदेशीर आहे."
बोलत असताना गाईड थोडा अवघडल्यासारखाही वाटतो, कारण आजूबाजूच्या लोकांना यांचा संशल आल्याची भीती त्याच्या मनात असते.

फोटो स्रोत, Reuters
अशा स्थितीतही गिल तामरी कॅमेऱ्याकडे पाहत म्हणतात, "इथे फक्त मुस्लीम धर्मीय येऊ शकतात. आतापर्यंत कोणत्याही इजरायली पत्रकाराने येथून प्रसारण केलेलं नाही."
तामरी व्हीडिओमध्ये पुढे म्हणतात, "आम्ही माऊंट अराफातला पोहोचलो. वरच्या बाजूला जात असताना माझ्या गाईडने मला मागे फिरण्याचा इशारा केला. 'हे दोघे मुस्लीम आहेत की नाही' अशी चर्चा येथील लोकांमध्ये सुरू असल्याचं गाईडने मला सांगितलं. त्यानंतर आम्ही थेट कारकडे गेलो आणि शहरातून निघून गेलो."
सोशल मीडियावरून टीका
चॅनल 13 वर गिल तामरी यांची वरील बातमी प्रसिद्ध होताच जगभरात खळबळ माजली.
यासंदर्भात ट्विटरवर 'अ ज्यू इन मक्काज ग्रँड मॉस्क' म्हणजे 'मक्केच्या भव्य मशिदीत एक ज्यू' हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला.
सोशल मीडियावर तर लोकांच्या प्रतिक्रियांची रांगच लागली होती.
बीबीसी उर्दूच्या बातमीनुसार, एका सौदी अरेबियन सामाजिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर याविषयी लिहिलं, "इस्रायलच्या माझ्या प्रिय मित्रांनो, तुमचा एक पत्रकार इस्लामच्या पवित्र शहरात घुसला. लज्जास्पदरित्या तिथे जाऊन व्हीडिओ बनवला. चॅनल 13 ने इस्लामचा अपमान केला आहे."
इस्रायने काय म्हटलं?
हा व्हीडिओ समोर आल्यानंतर चॅनल 13 आणि गिल तामरी यांना जगभरातून प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. इतकंच नव्हे तर त्यांच्या इजरायल प्रशासनाकडूनही बोलणी खावी लागली.

फोटो स्रोत, ANTOINE GYORI/CORBIS VIA GETTY IMAGES
इस्रायलचे विभागीय सहयोग मंत्री इसावी फ्रेज यांनी यावर प्रतिक्रिया दिली. गिल तामरी मक्का प्रवेश प्रकरणावर सरकारी माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, "मी यासाठी माफी मागतो. हा एक अत्यंत मूर्खपणाचा निर्णय होता. रेटिंगसाठी अशा प्रकारच्या बातम्या चालवणं हे बेजबाबदार आणि घातक कृत्य आहे."
एकीकडे इस्रायल आणि सौदी अरेबियाच्या संबंधांमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने सुधारणा होण्याची चिन्हे दिसत असताना या चॅनल 13 आणि गिल तामरी यांच्या बातमीमुळे पुन्हा तणाव वाढला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








