BulliBai, SulliDeals प्रकरण हे कटाचा भाग आहे का, याबाबत पोलीस तपास सुरू - हेमंत नगराळे

हेमंत नगराळे

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

Bulli Bai अॅप प्रकरण हे एखाद्या कटाचा भाग आहे का, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

तसंच या प्रकरणात तीन जण अटकेत असून आणखी काही आरोपींना अजूनही अटक झालेली नाही, असं नगराळे यांनी सांगितलं.

Bulli Bai नामक हे अॅप तयार करण्यात आलं. सोशल मीडियावर काही समाजातील महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले. त्यांच्या भावना दुखावतील असे मेसेज टाकण्यात आले, असं नगराळे म्हणाले.

सदर अॅप 31 तारखेला प्ले स्टोअरवर अपलोड करण्यात आलं होतं. तसंच Bulli Bai नावाचं ट्विटर हॅंडल तयार करण्यात आल्याचं लक्षात आलं. जेणेकरून हे अॅप लोकांपर्यंत पोहोचावं

त्यानंतर 2 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान याचे फॉलोवर्स कोण आहेत, याची माहिती घेत असताना विशाल कुमारचं नाव समोर आलं. याशिवाय आणखी पाच फॉलोवर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून हे ट्विटर अकाऊंट कुणी सुरू केलं, त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले, असं हेमंत नगराळे यांनी सांगितलं.

तीन जण अटकेत

या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिली.

विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयांक रावत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने उधमसिंह नगरमधून 18 वर्षीय श्वेता सिंह या मुलीला अटक केली आहे.

तिला उत्तराखंडच्या कोर्टासमोर हजर करून पाच दिवसांचा ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला आहे. त्यानंतर मुंबईत आणून कोर्टासमोर हजर केलं जाईल असं सहपोलीस आयुक्त गुन्हे मिलिंद भारंबे यांनी सांगितलं.

मुस्लीम, महिला, सोशल मीडिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुस्लीम महिलांच्या नावाचा वापर करून ट्रोलिंग होत आहे.

सदरहू मुलगी Bulli Bai App ची कथित मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार श्वेताने हे मोबाईल अॅप तयार केलं. विशाल कुमारकडून मिळालेल्या माहितीवर पोलिसांनी तिला अटक केली आहे.

दरम्यान आरोपी विशाल कुमारला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वांद्रे कोर्टाने हा निर्णय दिला होता.

मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने एका 21 वर्षीय युवकाला - विशाल कुमारला अटक केली आहे. या युवकाला बंगळुरूतून ताब्यात घेऊन मुंबईत चौकशीसाठी आणण्यात आलं. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

विशाल कुमारच्या घराची झडती घेण्याचीही कोर्टाने पोलिसांना परवानगी दिली आहे.

मुंबईचे सहपोलीस आयुक्त(गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. विशाल कुमार या आरोपी तरुणाला आज (4 जानेवारी) कोर्टात सादर करण्यात आलं.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा तरूण Bulli Bai अॅपचा एक फॉलोअर आहे. पेशाने हा युवक सिव्हील इंजीनिअर असून विद्यार्थी आहे.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी 3 जानेवारी रोजी रात्री या प्रकरणासंदर्भात मुंबई पोलिसांना महत्त्वपूर्ण शोध लागल्याचं स्पष्ट केलं होतं.

मुस्लिम महिलांच्या ट्रोलिंगच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली होती. पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा नाव बदलून मुस्लिम महिलांचे ट्रोलिंग होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

गेल्यावर्षी जुलै महिन्यामध्ये सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून मुस्लीम महिलांना ट्रोल करण्याचा प्रकार झाला होता. त्यानंतर सरकारनं संबंधित साईट्सवर बंदी घातली. पण पुन्हा एकदा दुसऱ्या नावानं हा प्रकार झाला.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

त्यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी तातडीने पोलिसांना आणि सरकारला याबाबत कारवाईची विनंती केली. त्यावर कारवाई करत या साईटवरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारच्या अॅपसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवही कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

3 जानेवारी रोजी रात्री गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या प्रकरणासंदर्भात मुंबई पोलिसांना महत्त्वपूर्ण शोध लागल्याचं स्पष्ट केलं. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूमधून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी प्रियंका चतुर्वेदी संसदेत शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित करणार होत्या. त्यासंबंधीचं निवेदनही त्यांनी ट्वीटरद्वारे पोस्ट केलं आहे.

पुन्हा ट्रोलिंगचे प्रकार सुरू?

मुस्लिम महिलांची खासगी माहिती, फोटो टाकून इंटरटेनटवर त्यांच्या ट्रोलिंगचा प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. शनिवारी पुन्हा एकदा अशाप्रकारची तक्रार समोर आली.

त्यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणी केंद्र सरकारच्या आयटी, गृह मंत्रालय आणि मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाई करण्याची विनंती केली.

आधी #SulliDeals नावाने ट्रोल करणारे आता #BulliBai नावाने महिलांन त्रास देत आहेत. मुंबई पोलिसांनी लवकरात लकर यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि ट्विटरनं त्यासाठी मदत करावी असं प्रियंका चतुर्वेदींनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

त्यानंतर माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावर प्रतिक्रिया देत या साईटवर बंदी घातली असून संबंधित यंत्रणांना कारवाईचे आदेश दिल्याचं सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी रविवारी सकाळी एक ट्विट केलं असून सरकारबरोबर याबाबत केलेला पत्रव्यवहार आणि त्याला मिळालेला प्रतिसाद याबाबत माहिती दिली.

संसदेत मांडणार होत्या मुद्दा

प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणी 30 जुलै आणि 6 सप्टेंबरला माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिल्याची माहिती दिली. ही पत्रंही त्यांनी ट्वीटद्वारे शेअर केली आहेत.

या पत्रांनंतर सरकारचं 2 नोव्हेंबरला याबाबतचं उत्तर मिळालं होतं. तेही प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीटद्वारे सादर केलं.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहरात हा मुद्दा प्रियंका चतुर्वेदी उपस्थित करणार होत्या. मात्र त्यांचं अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन झाल्यानं त्यांना मुद्दा उपस्थित करता आला नाही.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

त्यासाठीचं तयार केलेलं निवेदनही प्रियंका चतुर्वेदी यांनी या ट्विटमध्ये पोस्ट केलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

गेल्यावर्षी जुलै महिन्यात अनेक मुस्लीम महिलांच्या सोशल मीडियावरील फोटोंचा वापर करून एक ओपन सोर्स अॅप तयार करण्यात आलं. या अॅपचं नाव होतं - 'सुल्ली फॉर सेल'.

'सुल्ली' हा मुस्लिम महिलांसाठी वापरला जाणारा एक अपमानास्पद शब्द आहे.

मुस्लीम, महिला, सोशल मीडिया

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA

फोटो कॅप्शन, सोशल मीडिया

या अॅपमध्ये वापरली जाणारी मुस्लिम महिलांची माहिती ही ट्वीटरवरून घेण्यात आली होती. त्यात जवळपास 80 हून अधिक महिलांचे फोटो, त्यांची नावं आणि ट्विटर हँडल याची माहिती होती. या अॅपमध्ये सर्वांत वर लिहिलं होतं - 'फाइंड युवर सुल्ली डील.'

याला क्लिक केल्यानंतर एका मुस्लीम महिलेचा फोटो, नाव आणि ट्विटर हँडल याची माहिती युझरला मिळत होती. हे ओपन सोर्स अॅप गिटहबवर तयार करण्यात आलं होतं.

बीबीसीनं या प्रकरणी गिटहबशी ईमेल द्वारे संपर्क साधत काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर गिटहबनं उत्तरं दिली होती.

"आम्ही या प्रकरणी यूजरचं अकाऊंट डिलिट केलं आहे. रिपोर्ट्सच्या आधारे या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गिटहबचं धोरण हे एखाद्याचा अपमान, भेदभाव आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या कंटेंटच्या विरोधात आहे. त्यामुळं हा कंटेंट आमच्या धोरणांचं उल्लंघन आहे," असं गिटहबनं म्हटलं होतं.

ओपन सोर्स प्लॅटफॉर्म

बीबीसीनं अर्काइव्हच्या माध्यमातून हे अॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्यात मिळालेल्या माहितीनुसार 14 जूनला हे अॅप सुरू करण्यात आलं होतं. त्यावर सर्वाधिक हालचाली या 4-5 जुलैदरम्यान झाल्या.

हे एक ओपन सोर्स कम्युनिटी अॅप होतं. सॉफ्टवेअर कोडिंग प्रोव्हायडर प्लॅटफॉर्म गिटहबवर ते तयार करण्यात आलं होतं.

बीबीसीनं एका कोडरच्या माध्यमातून नेमकं ओपन सोर्स प्लॅटफॉर्म म्हणजे काय? आणि ते कसं काम करतं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.

मुस्लीम, महिला, सोशल मीडिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुस्लीम महिला

ओपन सोर्समध्ये कोड सार्वजनिक केला जातो. त्यात वेग-वेगळ्या कम्युनिटीचे कोडर कोडद्वारे नवे फिचर जोडू शकतात किंवा एखादा बग असल्यास तो हटवू शकतात.

मात्र कोडच्या माध्यमातून केले जाणारे हे बदल अॅपमध्ये दिसणार की नाही, याचं नियंत्रण अॅप डिझाईन करणाऱ्यांकडं असतं.

जर अॅप डिझाईन करणाऱ्यांकडून ते डिलिट झालं तर डोमेन नेम सिस्टम प्रोव्हाइडरकडं त्याची माहिती उपलब्ध असते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)