Omicron : महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 2 नवे रुग्ण, एकूण संख्या पोहोचली 20 वर

ओमिक्रॉन

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे दोन नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

यापैकी एक रुग्ण लातूरचा तर एक पुण्याचा आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजीच्या आजच्या अहवालानुसार, सध्या राज्यात 20 ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे नवे 569 रुग्ण आढळून आले. दिवसभरात कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 498 आहे. सोमवारी 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा 6507 आहे.

दरम्यान, कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणं वाढत असल्याचं पाहून सतर्कता राखली जात आहे.

महाराष्ट्रात 4 डिसेंबरला आढळला पहिला रुग्ण

महाराष्ट्रात शनिवारी (4 डिसेंबर) ओमिक्रॉनचा हिला रुग्ण आढळला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात हा रुग्ण राहत असून तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आला होता.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडला. काही दिवसांनी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

हाय रिस्क प्रवासी आणि हाय रिस्क देशांबद्दल काय आहेत नियम?

हाय रिस्क देशः

· दक्षिण अफ्रिका

· बोस्वाना

· झिब्बाब्वे

हाय रिस्क प्रवासी कोण?

· हाय रिस्क देशांमध्ये गेल्या 15 दिवसात प्रवास केलेले लोक

· हाय रिस्क देशातून येणारे प्रवासी

· हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR बंधनकारक

· 7 दिवस institution quarantine करावं लागणार. Positive असेल तर रुग्णालयात दाखल करणार

· 7 दिवसानंतर पुन्हा टेस्ट होणार. टेस्ट निगेटिव्ह आली तर 7 दिवस home quarantine

· इतर राज्यातून येणाऱ्यांना लशीचे दोन डोस अनिवार्य

· लस घेतली नसेल तर 72 तासांचा RTPCR टेस्ट

परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR रिपोर्ट गरजेचा नाही - राजेश टोपे

परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR रिपोर्ट गरजेचा नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मी याबाबत मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी चर्चा केली असून आज नोटिफिकेशन निघणार आहे असं राजेश टोपे यांनी म्हटलं. मात्र याचबरोबर लशीचे दोन्ही डोस झाले असले पाहिजे असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

याआधी, गुरूवारी (2 डिसेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारण्याच आलं. त्यांनी म्हटलं होतं, "काल केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलील तफावत होती. परदेशातून भारतातील विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी एकसारखा नियम असावा असा प्रयत्न आपण केलाय. यात काही दुमत नाही."

राजेश टोपे

देश म्हणून एक नियम असायला हवेत यासाठी नियम असायला हवेत, असं ते पुढे म्हणाले.

पण राज्य सरकारच्या नियमात देशातील इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 48 तासांचा RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला होता.

त्यावर ते म्हणाले, " इतर राज्यांतून येणाऱ्या 48 तासांचा RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागतो. आपण इतर राज्यात जातो तेव्हा RTPCR रिपोर्ट लागतोच. तर आपल्या राज्यात येण्यासाठी लागेल."

पण आता RTPCR ची आवश्यकता नसल्याचं टोपेंनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)