कोरोना व्हायरस: ऑक्सिजन खरेदीसाठी ब्रेट लीने केली 43 लाखांची मदत #5मोठ्या बातम्या

ब्रेट ली

फोटो स्रोत, facebook

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. कोरोना व्हायरस : ऑक्सिजन खरेदीसाठी ब्रेट लीने केली 43 लाखांची मदत, म्हणाला, 'भारत माझं दुसरं घर'

कोरोना संकटाशी लढा देत असलेल्या भारताच्या मदतीला जगभरातील अनेक देश धावून येत आहेत. क्रिकेटपटूही यामध्ये मागे नाहीत. सोमवारी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सनं 50 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 37 लाखांची मदत केली होती.

पॅट कमिन्सनंतर आता ब्रेट ली यानेही भारताला कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदत केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

ब्रेट लीने ऑक्सिजन खरेदीसाठी भारताला 1 बिटकॉईन म्हणजेच 43 लाखांची मदत केली. ब्रेट लीने ट्विट करून याबाबत माहिती दिली. भारत हे माझं दुसरं घर आहे, असं ब्रेट ली म्हणाला.

ब्रेट ली

फोटो स्रोत, facebbok

क्रिकेटमधील कारकीर्द आणि निवृत्तीनंतर इथल्या लोकांचं माझ्या मनात विशेष स्थान आहे. आपल्याला एकत्र येऊन लढण्याची गरज ब्रेट लीनं व्यक्त केली. ही बातमी लोकमतने दिली आहे.

2. रेमडेसिवीर मोफत वाटण्यासाठी मोडली 92 लाखांची एफडी

कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या माणुसकीचं दर्शन होत असून अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. यातच शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. लोकांना रेमडेसिवीर हे औषध मोफत वाटण्यासाठी बांगर यांनी आपली 92 लाखांची एफडी मोडल्याची माहिती समोर येत आहे.

संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत.

संतोष बांगर

फोटो स्रोत, facebook

झी 24 तासने दिलेल्या बातमीनुसार, बांगर यांनी आपल्या खर्चाने गरजूंना 500 इंजेक्शन्स दिले होते. परंतु संक्रमित लोकांची संख्या वाढत गेली. त्यानंतर इंजेक्शन तयार करणार्‍या कंपनीने, दहा हजार इंजेक्शनसाठी दीड कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले.

त्यामुळे त्यांनी 90 लाख रुपये खासगी लस वितरकाला देण्यासाठी एफडी मोडण्याचा निर्णय घेतला. लोकांची सेवा करणे हा आपला सर्वात मोठा धर्म आहे. ज्या लोकांनी आज आमदार केले, त्यांची सेवा करणे ही संकटाच्या वेळी मोठी माणुसकी आहे, अशी प्रतिक्रिया बांगर यांनी दिली आहे.

3. राज्यात दीड कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण

महाराष्ट्रात लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात येत असून 27 एप्रिलपर्यंत दीड कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे

फोटो स्रोत, facebook

याबाबत टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे. राज्याने यापुढे दररोज 8 लाख लोकांच्या लसीकरणाचं उद्दीष्ट ठेवावं, केंद्राकडूनही लसपुरवठा वेळेवर व्हायला हवा, असं टोपे यावेळी म्हणाले.

1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी 12 कोटी डोसेस लागतील. त्याच्या उपलब्धतेविषयी आरोग्य विभागामार्फत सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांना पत्र पाठविण्यात आलं आहे.

शिवाय, लस सरसकट मोफत द्यायची की फक्त आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना मोफत द्यावी, बाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असं टोपे यंनी सांगितलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

4. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक सज्ज - डॉ. हर्षवर्धन

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भारत कोरोनाविरुद्धच्या लढाईत मानसिक आणि शारिरीकरित्या अधिक सज्ज आहे, असं वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं आहे.

डॉ. हर्षवर्धन

फोटो स्रोत, facebook

चंदीगड, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांतील 13 विविध ठिकाणच्या रक्तदान शिबिरांचं उद्धाटन डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरुपात करण्यात आलं. याप्रसंगी ते बोलत होते.

कोरोना संकटात देशात रक्ताचा तुटवडा जाणवत असून लोकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं, असं आवाहन डॉ. हर्षवर्धन यांनी केलं. ही बातमी द हिंदूने दिली आहे.

5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकूचा कोरोनाने मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकूचं कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नर्मदाबेन मोदी असं मोदी यांच्या काकूचं नाव होतं. त्या 80 वर्षांच्या होत्या. त्या अहमदाबादमधल्या राणीप भागात मुलांसमवेत राहात असत. त्यांचे पती जगजीवनदास मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वडील दामोदरदास मोदी यांचे सख्खे बंधू होत. जगजीवनदास यांचं अनेक वर्षांपूर्वी निधन झालं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

नर्मदाबेन गेल्या 10 दिवसांपासून अहमदाबादच्या सिव्हील रुग्णालयात उपचार घेत होत्या. पण प्रकृती खूपच जास्त खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला, असं प्रल्हाद मोदी यांनी सांगितलं. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)