कोरोना व्हायरस: डॉ. मनिषा जाधव यांची शेवटची पोस्ट, 'कदाचित हे माझे शेवटचे गुड मॉर्निंग असेल'

मनिषा जाधव

फोटो स्रोत, Manisha Jadhav

शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉ. मनिषा जाधव यांचा हा मेसेज व्हायरल होत आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांचे सोमवारी रात्री मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात निधन झाले. त्या 51 वर्षांच्या होत्या.

त्यांना आपल्या मृत्यूची चाहुल लागली होती का असा ही प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.

मनिषा जाधव यांच्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होते. त्यांचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. "कदाचित ही माझे शेवटचे गुड मॉर्निंग असेल. कदाचित तुम्हाला या ठिकाणी मी पुन्हा भेटू शकणार नाही. सर्वांनी काळजी घ्या. शरीर मृत पावते आत्मा नाही, आत्मा अमर आहे."

ही पोस्ट लिहिल्याच्या 36 तासानंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना धीर देणाऱ्या पोस्ट लिहिल्या होत्या.

मनिषा जाधव

फोटो स्रोत, Manisha Jadhav

"काळजी करू नका, आपण लवकर बऱ्या व्हाल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काहीही होणार नाही' अशा आशयाच्या कमेंट्स करण्यात आल्या होत्या."

त्यांच्या निधनावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शोक व्यक्त केला आहे. आपण एका चांगल्या डॉक्टरला गमावले आहे असं त्या म्हणाल्या. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे याची आम्हाला जाणीव आहे असं त्या माध्यमांना म्हणाल्या.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

कोरोना रुग्णांची सेवा करता करता अनेक डॉक्टरांना कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसत आहे. त्यातून अनेक जण आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसत आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)