सोनू निगम सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर काय म्हणाला?

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक अभिनेत्यांनी तसेच कलाकारांनी आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे.

बॉलीवूड आणि संगीत क्षेत्रामध्ये घराणेशाही आणि गटबाजी होत असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर या आरोप-प्रत्यारोपांमध्ये वाढ झाली आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलीवूडमधील दोषांवर बोट ठेवल्यांनतर त्यावर अधिक चर्चा होत आहे.

आता गायक सोनू निगमनेही त्यामध्ये उडी घेतली आहे. जर म्युझिक इंडस्ट्रीमधील गटबाजी संपली नाही तर या क्षेत्रातूनही आत्महत्येची बातमी येऊ शकते असं त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

साडेसात मिनिटांच्या व्हीडिओमध्ये सोनूने आपल्या भावना मांडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून माझा मूड चांगला नसल्यामुळे मी व्हीडिओ केला नाही, सगळा भारत तणावाखाली आहे. सुशांत सिंह राजपूत गेल्यामुळे मानसिक आणि भावनिक ताण आला होता. एका तरुणाचा असा मृत्यू पाहिल्यामुळे दुःख होणं साहजिकच आहे, असं सोनू त्यात म्हमाला आहे.

चित्रपटांपेक्षा म्युझिक माफिया मोठे

सोनू निगमने म्युझिक इंडस्ट्रीबद्दल बोलताना सांगितले, आज बॉलीवूडमधील सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला आहे. एक अभिनेता मृत्युमुखी पडला. उद्या एखाद्या गायकाबद्दलही अशी बातमी येऊ शकते. किंवा संगीतकार, कम्पोजरबद्दलही तुम्हाला अशी बातमी मिळू शकते. चित्रपटांपेक्षा म्युझिक माफिया मोठे आहेत. या क्षेत्रात जी नवी मुलं आली आहेत ती त्रस्त आहेत. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये दोन माणसांकडेच सर्व ताकड आहे. ज्यांची कंपनी आहे तेच या गायकाला काम द्या, त्याला नको हे निर्णय घेतात. तुम्ही लोक असं करु नका. असे शाप घेणे वाईट आहे.

ज्या लोकांवार आजकाल आरोप होत आहेत त्यांच्याबरोबर आपणही काम केल्याचं सोनू सांगतो. त्याच्याबाबतीतही असेच वर्तन झाल्याचे तो सागंतो.

तो म्हणतो, ज्या व्यक्तीवर आरोप होत आहे त्यानं याच्याकडून गाणं गाऊन घेऊ नका असं सांगितलं आहे, तसंच अरिजित सिंहच्या बाबतीतही असच वर्तन झालं आहे. तुम्ही तुमच्या ताकदीचा वापर असा कसा करू शकता

सोनू निगमचा हा व्हीडिओ दोन लाख वेळा पाहिला गेला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)