केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा- मुख्यमंत्री #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, FACEBOOK/KETAKI CHITALE
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांची सूचना
अभिनेत्री केतकी चितळेला सोशल मीडियावर खोट्या अकाउंटचा वापर करून अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लोकसत्तानं आणि News 18 लोकमतनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

फोटो स्रोत, Neelam Gore
या प्रकरणी ट्रोलर्सवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष विजय औटी यांची भेट घेतली. गोऱ्हे यांनी ट्वीट करून या भेटीची माहिती दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
सोशल मीडियावर डमी आणि खोट्या अकाउंटवरून अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना अटक करून कडक कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित पोलीस उपायुक्तांना दिली आहे.
2. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता शिक्षणाची अट नाही - नितीन गडकरी
समाजातले कमी शिकलेले आणि गरीब लोक ड्रायव्हरच्या नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. यापूर्वी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आठवी पासची अट होती. ती अट आता काढून टाकली आहे. त्यामुळं त्यांना कोणती अडचण येणार नाही, असं केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
गडकरी यांच्या कार्यालयानं ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. तसंच सकाळनंही हे वृत्त दिलं आहे.
सध्या या क्षेत्रात 22 लाखाहून अधिक ड्रायव्हरांची गरज आहे. ड्रायव्हर होण्यासाठी आता पुस्तकी शिक्षणापैक्षा कौशल्याला अधिक महत्त्व असल्यानं देशांतर्गत वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
नवीन मोटर वाहन कायद्यात ही तरतूद आहेच पण हे विधेयक सध्या राज्यसभेत रखडलेलं आहे. त्यामुळं महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्रालयानं हा निर्णय घेतला असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
3. 'एक देश, एक निवडणुकी'ला बहुतांश पक्षांचा पाठिंबा - राजनाथ सिंह
'एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (19जून) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावेळी उपस्थित असलेल्या बहुतांश पक्षांच्या प्रमुखांनी 'एक देश, एक निवडणूक' या योजनेस पाठिंबा दिला असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
या बैठकीला सुमारे 21 पक्षांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली. या बैठकीला राहुल गांधी, मायावती, ममता बॅनर्जी हे प्रमुख विरोधी पक्षांचे नेते अनुपस्थित होते.
तसेच यासंदर्भात विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचंही सिंह यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
'एक देश, एक निवडणूक' अंतर्गत देशातील लोकसभा आणि सर्व विधानसभांची निवडणूक एकाच वेळी घेण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने गांभीर्याने पावले उचलली आहेत.
बैठक झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, ''आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित असलेल्या बहुतांश पक्षांच्या प्रमुखांनी 'एक देश, एक निवडणूक' या कल्पनेला पाठिंबा दिला आहे. CPI(M) आणि CPI या पक्षांनी वेगळे मत मांडलं आहे. पण या कल्पनेला विरोध दर्शवला नाही. ही योजना राबवायची कशी याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.''
4. नवनीत राणांना भाजपकडून 'जय श्रीराम' लिहिलेली 5000 पत्रं
भाजप कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना 'जय श्रीराम' लिहिलेली 5 हजार पोस्टकार्ड पाठवली आहेत. संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ही मोहीम राबविली जात असून, एकट्या दर्यापूर तालुक्यातून पाच हजार पत्र खासदार नवनीत राणा यांना पाठवण्यात आल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. TV9 मराठीनं हे वृत दिलं आहे.
संसदेमध्ये भाजप खासदारांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या होत्या. नवनीत राणा यांनी या गोष्टीला आक्षेप घेतला होता.

फोटो स्रोत, Navneet Rana
'जय श्रीराम'च्या घोषणा संसदेत नाही तर मंदिरात द्या, असं खासदार नवनीत राणांनी म्हटलं होतं.
5. संसदेत यापुढं धार्मिक घोषणा देऊ देणार नाही - लोकसभा सभापती ओम बिर्ला
संसदेत यापुढं धार्मिक घोषणा देऊ देणार नाही, असं नवनियुक्त लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हंगामी सभापतींनी त्या घोषणा संसदीय कामकाजातून वगळून योग्य निर्णय घेतला आहे, असंही बिर्ला यांनी म्हटलं. खासदार नवनीत राणा, UPA अध्यक्षा सोनिया गांधी, AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शपथ घेताना धार्मिक घोषणा दिल्या गेल्या.

फोटो स्रोत, Press Trust of India
"घोषणा देण्यासाठी, हौदात उतरण्यासाठी, फलक दाखवण्यासाठी संसद ही जागा नाहीये. त्यासाठी रस्त्यांवर जा आणि तिथं निर्दर्शनं करा. सरकारवर जी काही टीका करायची आहे ती करा, पण त्यासाठी सभागृहाच्या हौद्यात येणं गरजेचं नाही," असं त्यांनी म्हटलं आहे.
यापुढं घोषणा थांबतील का, या प्रश्नावर मात्र त्यांनी असं आश्वासन देता येणार नाही असं म्हटलं. "अशा घटना परत घडतील की नाही यावर काही सांगता येत नाही. पण आम्ही संसदेचं कामकाज नियमानुसारच चालवू," असं बिर्ला यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)