IPL : हैदराबादला फायनलमध्ये पोहोचवणारा अफगाणी ऑल राउंडर

राशिद खान

फोटो स्रोत, Getty Images

सनरायजर्स हैदराबाद संघाने आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील क्वालिफायर-2 लढतीत कोलकाता नाइट रायडर्स संघावर 13 धावांनी मात केली आणि अंतिम फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं. या मॅचमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे राशीद खान या अफगाणी ऑल राउंडरनं!

आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात हैदराबादची लढत चेन्नई सुपरकिंग्ससोबत होणार आहे. याआधी क्वालिफायर-1 सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सनं सनरायजर्स हैदराबादला हरवलं होतं.

या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचं पारडं जड वाटत होतं कारण त्यांनी टॉस जिंकल्यावर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पण सनरायजर्सनं त्यांना मात दिली. सनरायजर्स हैदराबादकडून खेळणारा अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशीद खान या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 34 रन काढल्या आणि तीन विकेटही घेतल्या.

राशीद खानची आतषबाजी

अफगाणिस्तानचा खेळाडू राशीद खाननं या मॅचमध्ये सर्वांना चकित केलं. फक्त 10 बॉलमध्ये त्याने 34 रन काढले. चार सिक्सर आणि दो फोर मारून त्याने आपल्या टीमची धावसंख्या वाढवली.

राशीद खानच्या बॅटिंगच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादनं 174 धावांचं आव्हान समोर ठेवलं.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायजर्सनं 175 रनांचं लक्ष्य दिलं. कोलकाताची सुरुवात चांगली झाली. सलामीला आलेल्या क्रिस लीननं 48 रन काढल्या. पण त्यांचा डाव 161 धावांत आटोपला.

आंद्रे रसेल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोलकाताच्या आंद्रे रसेलनं तीन रन काढल्या.

चौथ्या ओव्हरमध्ये सुनिल नारायणनं 26 रन काढल्या आणि तो कॅच आऊट झाला. त्यानंतर नितीश राणा आला आणि 22 रन काढून आऊट झाला. रॉबिन उथप्पानं 2 आणि दिनेश कार्तिकनं 8 धावा काढल्या.

सहाव्या नंबरला आलेल्या शुभमन गिलनं 30 रन काढले पण तो 20 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. कोलकाताला शेवटच्या ओव्हरमध्ये 19 रन पाहिजे होते पण हैदराबादच्या कार्लोस ब्रेथवेटच्या बॉलिंगसमोर ते निष्प्रभ झाले आणि कोलकाताचा खेळ संपला.

हैदराबादकडून बॅटिंगसाठी आलेल्या वृद्धिमान साहा आणि शिखर धवन यांनी 56 धावांची भागीदारी केली.

शिखर धवन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिखर धवननं 34 रन बनवले

आठव्या ओव्हरमध्ये पहिली विकेट गेली. शिखर धवनने 24 बॉलमध्ये 34 रन काढले होते. त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या केन विल्यम्सनं केवळ तीन रन काढल्या.

हेही वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)