बीबीसी विशेष : हादिया विचारते, 'लोकांना इस्लाम स्वीकारण्याचा हक्क नाही का?'

फोटो स्रोत, SONU AV
- Author, इमरान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
कथित 'लव्ह जिहाद'च्या आरोपामुळे चर्चेत आलेलं जोडप म्हणजे हादिया आणि शफीन जहां. या दोघांचं लग्न सुप्रीम कोर्टाने वैध ठरवल्यानंतर शफीन यांनी पहिल्यांदाच त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांनी हादियाशी लग्न का केलं, याबद्दल ते प्रथमच व्यक्त झाले आहेत.
दोघांचा विवाह संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरल्यानं, 'हादियाशी लग्न का केलं' हा प्रश्न शफीन यांना विचारण आवश्यक होतं.
बीबीसीशी बोलताना शफीन यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. ते म्हणाले, "आम्ही दोघं भारतीय म्हणून जन्मलो आणि एकमेकांसमवेत राहण्याचं स्वातंत्र्य आम्हाला आहे. कोणासोबत राहायचं हे निवडण्याचा अधिकार आम्हाला आहे. ती मला आवडतं होती, त्यामुळे मी तिच्याशी लग्न केलं."
अखिला अशोकन हिने धर्मांतर केल्यानंतर शफीनशी लग्न केलं होतं आणि त्यानंतर तिने हादिया असं नवीन नाव धारण केलं. यावर वाद सुरू झाल्यानंतर शफीन यांनी प्रथमच मोकळेपणानं त्याची भूमिका मांडली आहे.
न्याय मिळाल्यानं आनंद
आतापर्यंत हादिया एक सशक्त महिला म्हणून आपली मत मांडत आली आहे. तिचं म्हणनं थेट ऐकून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं तिला समन्स जारी केला होता.
केरळ हायकोर्टाने दोघांचा विवाह रद्द करायला नको होता, असं सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटलं.
तर दोन प्रौढ व्यक्तींनी सहमतीनं केलेलं लग्न रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाकडे आहे का, असा प्रश्न याआधी उपस्थित झाला होता.

फोटो स्रोत, A S SATHEESH/BBC
हादियाने बीबीसीशी बोलताना म्हणाली, "मला न्याय मिळाल्यानं फार आनंद झाला आहे. जे हायकोर्टाकडून मला मिळू शकले नाही, ते सुप्रीम कोर्टाकडून मला मिळालं आहे."
आपल्या मुलीने इस्लाम धर्म स्वीकारल्याची माहिती जेव्हा हादियाचे वडील के. एम. अशोकन यांना झाली तेव्हा या प्रकरणाला हवा मिळाली. अशोकन यांनी केरळ हायकोर्टात हेबीअस कॉर्पस याचिका दाखल केली होती.
इस्लाम धर्माने प्रभावित झाल्याने हा धर्म स्वीकारल्याचं हादियाने हायकोर्टामध्ये सांगितलं होतं.
हादिया म्हणते, "माझ्या लग्नावरून इतका वाद निर्माण व्हायचं कारण हेच आहे की मी इस्लाम धर्म स्वीकारला. लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचा अधिकार नाही का?"
हा वाद कधी सुरू झाला?
हादियाचे वडील के. एम. अशोकन यांच मत होतं की, त्यांच्या मुलीच्या मित्राचे वडील अबूबकर यांच्या प्रभावात आल्यानंतर हादियाला बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले.
अशोकन यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर अबूबकर यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच हादिया गायब झाली.

फोटो स्रोत, Reuters
हे तेव्हा घडलं जेव्हा अशोकन यांनी हेबीअस कॉर्पस याचिका दाखल केली होती. अशोकन यांनी नंतर आणखी एक याचिका दाखल करत त्यांच्या मुलीला देशाबाहेर नेण्यात येऊ शकते, अशी शंका व्यक्त केली.
यानंतर शफीनने हादियाबरोबर विवाह केला आणि सुनावणीदरम्यान ते कोर्टात हजरही रहायला लागले.
पण अॅडिशनल सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग यांनी कोर्टाला सांगितलं की, जहालवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबधित कट्टरतावादी संघटना या हिंदू मुलींच्या धर्मपरिवर्तनात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी अनेक पुरावे आहेत. सिंग यांनी कोर्टात असं सांगितल्या नंतर हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) वर्ग करण्यात आले.

फोटो स्रोत, PTI
NIAचा तपास शफीनच्या संशयित 'दहशतवादी' संबंधावर आधारीत होता. कारण तो पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाचा (PFI) सदस्य होता. तसेच नोकरीनिमित्त मस्कत आणि ओमानलाही जाऊन आलेला आहे.
तथापि NIAचा तपास सुरू राहील, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
PFIचे मानले आभार
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शफीन जवळपास 500 किलोमीटरचा प्रवास करून पत्नी हादियाला घेण्यासाठी कोल्लम (केरळ) इथून सलेम (तामिळनाडू) इथं गेले.
हादिया इथं एका होमियोपॅथिक कॉलेजमध्ये शिक्षण घेते. कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यापूर्वी ते पुन्हा 500 किलोमीटरचा प्रवास करून कोझिकोड इथं गेले.

फोटो स्रोत, PTI
कोझिकोडला पोहचल्यानंतर हे दाम्पत्य बरेच थकलेलं दिसत होते. कोझिकोड इथं PFIचे अध्यक्ष इलामरम नसरुद्दीन यांना भेटण्यासाठी संघटनेच्या युनिटी हाऊस मुख्यालयात ते आले होते.
शफीन म्हणाले, "हे फक्त PFIमुळेच शक्य झाले. त्यांनी आमची फार मदत केली."
याच ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत हादियाने सांगितलं की, "त्यांनी इतर दोन संघटनांकडेही मदतीसाठी संपर्क साधला होता. पण फक्त PFIचं त्यांना मदत करण्यासाठी पुढं आली."
एका पत्रकाराने त्यांच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांबाबत विचारणा केली असता हादिया म्हणाली, "आरोप तर कुणीही लावू शकतं. जर शफीन नसता तर माझ्याबरोबर कोण उभं राहीलं असतं? असे अनेक लोक आहेत, अशा अनेक मुस्लीम संघटना आहे, ज्यांनी मला मदत करण्यास नकार दिला. मी त्यांची नावं घेऊ इच्छित नाही."
ती म्हणते, "मला मदत करणाऱ्या संघटनांच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्या संघटनाही होत्या."
अद्याप सोबत नाही राहू शकणार
सुप्रीम कोर्टाकडून त्यांच्या विवाहास संमती मिळाली असली तरी हे दाम्पत्य अद्याप एकमेकांसमवेत राहू शकणार नाहीत.

फोटो स्रोत, SONU AV
शफीन म्हणतात, "कॉलेजने यांना (हादिया) फक्त तीन दिवसांची सुटी दिली आहे. त्यानंतर ती कॉलेजला परतणार आहे."
पुढे शफीन म्हणतात, "ती आपलं शिक्षण घेते आहे. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही इतरांप्रमाणचं सर्वसामान्य जीवन जगू शकणार आहोत."
शफीन म्हणतात, "मी मस्कतमध्ये प्रशासकीय सचिव म्हणून आपण काम करत होतो. पण या केसमुळे मला नोकरी गमवावी लागली. सध्या मी केरळमध्येच राहतात."
करिअरची घडी बसवण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. या न्यायालयीन लढाईमुळे आपण फार थकलो असल्याचं शफीन सांगतात.
NIAच्या तपासाला सहकार्य करण्याविषयी विचारलं असता शफीन म्हणाले, "त्यांनी जिथं-जिथं आणि ज्यावेळेसही मला बोलावले आहे मी तिथं गेलो आहे."
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








