कोण जिंकणार गुजरात? प्रचाराच्या या रंगांवरून कळतंय का, बघा!

तरुण मतदार

फोटो स्रोत, kalpit bhachech

फोटो कॅप्शन, तरुण मतदार

गुजरात निवडणुकांमध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. गेल्या कित्येक महिन्यांमध्ये गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी माजली होती.

किती साऱ्या सभा झाल्या, भाषणं झालीत. आरोप-प्रत्यारोप झाले आणि त्यातून लोकांनी आपलं मन बनवलं आहे.

निवडणुका आल्या की अख्खं राज्य, आपण एखाद्या सणासाठी तयार होतं, तसं सजतं. झेंडे-पताका, बॅनर वगैरे चहुबाजूला दिसू लागतात.

आणि अखेर बुधवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. गुरुवारी संध्याकाळ होता होता उमेदवारांचं भविष्य मतपेटीमध्ये सील होईल.

गेली तीन महिने गुजरातने हे सगळं अनुभवलं. पाहूया त्याच प्रचारामध्ये टिपलेले हे काही क्षण.

प्रचाराचे रंग

फोटो स्रोत, Getty Images

प्रचारादरम्यान एकाच पतंगावर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी फोटो छापले होते. म्हणजे जमिनीवर तर जमिनीवर, हवेतही त्यांची टक्कर झाली.

प्रचाराचे रंग

फोटो स्रोत, Getty Images

यंदाच्या निवडणुकीत लोकांच्या 'डोक्यावर' प्रचाराचं भूत चढलं होतं. तरुणाईला मतदान करायला प्रोत्साहीत करण्यासाठी नवनवीन कल्पना लढवल्या. ही त्यातलीच एक कल्पना.

एका तरुणीने चक्क मतपेटीच आपल्या केशरचनेतून साकारली.

प्रचाराचे रंग

फोटो स्रोत, Getty Images

गुजरात निवडणुकांमधल्या मुख्य चेहऱ्यांमध्ये कुठेही मुली किंवा महिला नसतील, तरीही यंदाच्या प्रचारात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

प्रचाराचे रंग

फोटो स्रोत, Getty Images

प्रचारसभांमध्ये भाषणांबरोवर लोकांची करमणूक करण्यासाठी काही कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. अर्थात अशा कार्यक्रमांमधूनही प्रचारच केला गेला.

प्रचाराचे रंग

फोटो स्रोत, Getty Images

हा छोटू यावेळी मतदान तर करू शकणार नाही. पण त्याने प्रचाराला मात्र पुरेपूर हातभार लावला.

प्रचाराचे रंग

फोटो स्रोत, Getty Images

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसची प्रचारधुरा राहुल गांधींच्या हाती होती. आणि त्यातच त्यांची पक्षाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.

म्हणूनच कदाचित मोदींच्या मुखवट्यांसोबतच राहुल गांधींचे मुखवटेही जास्त दिसले.

प्रचाराचे रंग

फोटो स्रोत, Getty Images

आणि प्रथमच कुठलीही निवडणूक न लढणाऱ्या, किंवा लढू न शकणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या सभांना प्रंचड गर्दी दिसली.

पाहा हार्दिक पटेलच्या एका सभेत जमलेले लोक काय म्हणत आहेत?

Facebook पोस्टवरून पुढे जा, 1

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त, 1

पटेल आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयास आलेल्या हार्दिक पटेलच्या सभांनी गर्दी खेचली. भाजपला मतदान करू नका, हे ठासून सांगणाऱ्या हार्दिक यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

प्रचाराचे रंग

फोटो स्रोत, Getty Images

ज्या सभांना गर्दी होईल, अशी भाकितं केली होती, त्या सभांना विशेष गर्दी नव्हती. आणि हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर यांच्या सभांनी बरीच गर्दी खेचली.

प्रचाराचे रंग

फोटो स्रोत, Getty Images

एकीकडे हार्दिक तर दुसरीकडे ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांचा साथ काँग्रेसला लाभला.

राहुल गांधींच्या हाती धुरा गेल्यावर काँग्रेसचं नशीब बदलणार का, हे आता 18 डिसेंबरलाच कळेल!

पाहा गुजरात मधून बीबीसी मराठीचं हे लाईव्ह कवरेज :

Facebook पोस्टवरून पुढे जा, 2

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त, 2

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)